Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दुचाकीचोर पुन्हा सक्रिय , शहरातून दहा दुचाकी लंपास

Spread the love

औरंंंगाबाद : वाहने लंपास करणार्‍या चोरट्यांनी शहरातील वाहन धारकांच्या नाकात दम आनला आहे. वाहने लंपास करणार्‍या चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून तब्बल दहा दुचाकी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी पोलीसांनी नेहमी प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

विष्णुनगरातील कैलास  तोलंबे यांची दुचाकी (एमएच-२०-डी.क्यु-१६३७) चोरट्यांनी सिग्मा हॉस्टिल समोरून लंपास केली. हुसेन कॉलनीतील शेख इस्माइल शेख महेमुद यांची दुचाकी (एमएच-२०-सी.व्ही-९२७७) घरासमोरून लंपास केली. संपतकुमार गडमिदी यांची दुचाकी (एमएच-१६-सीपी-२६०७) नक्षत्रवाडीतील दिशा चैत्रबन अपार्टमेंटच्या पार्कीगमधुन लंपास केली. उध्दव पवार यांची दुचाकी (एमएच-२०-इएफ-२१५४) घरासमोरून लंपास केली. दिपक जाधव यांची दुचाकी (एमएच-२०-डी.पी-३९१८) घरासमोरून लंपास केली. कन्नड पिशोर येथील रामेश्वर सुरडकर यांची दुचाकी (एमएच-२०-बीडी-२६४७) चोरट्याने लंपास केली. जयभवानीनगरातील महेश शेळके यांची दुचाकी (एमएच-१७-सी.एफ-६२०३) पिसादेवी येथून लंपास केली. ठाकरेनगरातील नागेश गणोरकर यांची दुचाकी (एमएच-२०-व्ही-६४१) घरासमोरून आणि वाळुज येथील राजु निकाळजे यांची दुचाकी (एमएच-२०-सीपी-५२३७) एपीआय कार्नर समोरून लंपास केली.भोईवाडयातील उदय कॉलनीतील गणेश टेनपुरे यांची दुचाकी (एमएच-२०-इ.एक्स-२९०६) चोरट्यांनी घरासमोरून लंपास केली. विविध भागातून वाहन चोरी करणार्‍या चोरट्याविरुध्द अनुक्रमे जवाहरनगर, पुंडलिकनगर, वाळुज, सातारा, क्रांतीचौक, एमआयडीसी सिडको, मुकुंदवाडी, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!