Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Ayodhya verdict : कोण काय म्हणाले ? देशभरातील नेत्यांकडून निकालाचे स्वागत , शांततेचे केले आवाहन

Spread the love

गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाच्या पीठाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे आता वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजले जात आहे. दरम्यान, मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या निकालाचे  देशातील नेत्यांनी स्वागत केले असून नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

देशाचा क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने ‘श्री राम जय राम जय जय राम’ असं ट्वीट करत प्रभू रामांचा फोटोही शेअर केला. सेहवाग नेहमी त्याच्या परखड मत करण्यासाठी ओळखला जातो. सुप्रीम कोर्टाने निकाल देताच काही मिनिटात सेहवागने ट्वीट करत अत्यंत मोजक्या शब्दात त्याची प्रतिक्रिया दिली.

निर्णय स्वीकारून शांतता राखावी -नितीन गडकरी

राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालावर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार करावा आणि शांतता राखावी, गडकरी यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल 

अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे कि , सर्व पक्षांचा युक्तवाद ऐकून पाच न्यायमूर्तींनी एकमताने अयोध्या प्रकरणात आपला ऐतिहासिक निकाल दिला आहे . या निकालाचे आम्ही स्वागत करतो. सर्वांना विनंती आहे कि , सर्वांनी शान्तता राखावी . हा वाद आता न्यायालयाने संपवला आहे.

उमा भरती  यांनी याबाबत ट्विट केले आहे कि ,  ”माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेली या दिव्या निकालाचे आम्ही स्वागत करतो . आज आम्हाला अशोक सिंघल यांची आठवण येत आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन . ज्यांनी अयोध्या उभारणीच्या आंदोलनात महत्वपूर्ण योगदान दिले आहे . त्याच बरोबर लालकृष्ण आडवाणी यांचेही आम्ही अभिनंदन करतो.

नितीशकुमार यांनी म्हटले आहे कि , सर्वांनीच या निकालाचे स्वागत केले पाहिजे . आणि एकमेकांचा सन्मान केला पाहिजे . सर्वोच्च न्यायालयाने सर्व संमतीने हा निकाल दिल आहे .

हिन्‍दू महासभेचे  वकील वरुण कुमार सिन्‍हा यांनी म्हटले आहे कि , हा निकाल भारतीयांसाठी ऐतिहासिक आहे. विविधतेत एकता कायम ठेवण्याचा हा संदेश आहे. हिंदूंसाठी हा उत्सवाचा दिवस आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हा निकाल म्हणजे मैलाचा दगड असल्याचे म्हटले आहे . सर्वांनीच या निकालाचे स्वागत करून देशात शांतता राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

संघाचे प्रवक्ते मा . गो . वैद्य यांनी म्हटले आहे कि , अयोध्या आता विवादित राहिली नाही. आता तेथे राम मंदिर बनेल . त्याच बरोबर मुस्लिमांनाही न्यायालयाने जमीन देण्याचे आदेशित केले आहे. जे लोक निकालावर णर्ज आहेत ते या निर्णयाला आव्हान देऊ शकतात .

माजी लोकसभा अध्यक्ष  सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे कि ,  अतिशय संतुलित हा निकाल आहे त्याचे स्वागत केले पाहिजे आणि सरकारने मुस्लिमांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मशिदीसाठी जमीन उपलब्ध करून दिली पाहिजे.

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी म्हटले आहे कि , सर्वांनीच या निकालाचे स्वागत करून शांतता कायम ठेवण्याची गरज आहे. राम सर्वांचे आहेत . कुठल्याही विशिष्ठ समाजाचे नाहीत. राम एकतेचे प्रतीक आहेत. देशातील स्रवत लोक रामाचा आदर करतात. आता राम मंदिराच्या उभारणीकडे लक्ष देण्याची गरज आहे.राष्ट्रासाठी हा निकाल गौरवाची बाब आहे.

दरम्यान मस्लिम समाजाच्या वकिलांनी मात्र निकालावर नाराजी व्यक्त केली असून त्यांनी म्हटले आहे कि , आम्ही निकालाचा अभ्यास करून सत्यशोधनाचा प्रयत्न करू . देशातील नागरिकांनी न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करून शांतता कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

दुसऱ्या एका मुस्लिम पक्षकार वकिलाने म्हटले आहे कि , हा निकाल  बाबरी मशीद देत नाही . पाच एकर जमीन आमच्यासाठी निकाल नाही . आम्ही निकालावर निराश आहोत परंतु नागरिकांना आमचे आवाहन आहे कि , त्यांनी देशात शांतता स्थापन करावी.

ट्विटरवर  शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले आहे कि , कुठल्याही पक्षाचा हा निकाल  नाही . सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने दिलेल्या निकालाचे सर्वानीच स्वागत करायला हवे .

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!