Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Ayodhya verdict : कोण काय म्हणाले ? निकालाचा अभ्यास करून पुढचे कायदेशीर पाऊल उचलू : पक्षकारांचे वकील जिलानी

Spread the love

बहुचर्चित राम जन्मभूमी-बाबरी मशीद वागद्रस्त जमीन प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा आम्ही सन्मान करतो, मात्र हा निकाल समाधानकारक  नसल्याचे मुस्लीम पक्षकारांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. या बाबत नक्की काय करायचे याबाबत विचारपूर्वक निर्णय घेतल्यानंतरच आम्ही पुढील पाऊल उचलू असेही या पक्षकारांनी स्पष्ट केले आहे.

जिलानी म्हणाले कि , सर्वोच्च न्यायालयाने मशीद बांधली गेली हे मान्य केले गेले. मात्र, १९५७ पूर्वी नमाज पढला गेला नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटेल आहे. तिथे नमाजही करत नाही, आणि कुणी पूजाही करत नव्हते. मात्र, वादग्रस्त जागेच मशीद अस्तित्वात होती असे सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहे. मग जर तिथे मशीद असेल तर नमाजही पढला गेला असणारच. यामुळे जिथे एका धर्माचे लोक प्रार्थना करतात, ती जागा दुसऱ्या धर्माच्या लोकांना देणे, हा प्रकार आम्हाला समजला नसल्याचे जफरयाब जिलानी म्हणाले.

वकिलांची टीम सल्ला मसलतीनंतर यावर काय करायचे याचा निर्णय घेतला नाही. या संदर्भात मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाशी चर्चा करण्यात येणार असल्यातेही ते म्हणाले. ही जमीन एकाच पक्षाला देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत. यामुळे चर्चेनंतर आम्ही या निर्णयाला आव्हान देणार असल्याचेही जिलानी म्हणाले. या अगोदर आपण सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयाचा पूर्ण अभ्यास करूनच पुढील पाऊल उचलू असेही ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!