Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Live News Updates : भाजप-सेना युतीचा खेळ खल्लास !! सरकार भाजपचेच येणार : देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास , Live Press Conference Of Devendra Fadanvis

Spread the love


भाजप -सेना युतीचा खेळ खल्लास ।  पुढील निर्णय राज्यपालांचा । भाजपचेच सरकार बनणार

देवेंद्र फडणवीस आणि भाजपने विषय संपवला । विलंबाला शिवसेनाच जबाबदार 

निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर राज्यात पारदर्शी सरकार देण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. शिवसेनेशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण शिवसेनेनेच आमच्याशी चर्चा करणं थांबवलं, असं सांगतानाच मी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अनेकवेळा फोन केले. पण उद्धव ठाकरे यांनी माझा एकही फोन घेतला नाही, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधाताना फडणवीस यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर हा आरोप केला. 


  • शिवसेनेने ज्या भाषेत आमच्यावर टीका केली ती विरोधी पक्षानेही कधी केली नाही. मोदींच्या विरोधातही ते जे बोलले ते समर्थनीय नाही.अशी युती होऊ शकत नाही.
  • माझ्यासमोर अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्री असे काही ठरलेच नाही . मी शहांना विचारले त्यांनीही तसा काही निर्णय झाला नसल्याचेच सांगितले . त्यामुळे काहीच चुकीचे वक्तव्य केले नाही. पण यावरून शिवसेनेकडून जे बोलले गेले ते वेदनायक होते.
  • भाजपसोबत राहावे हि शिवसेनेची इच्छा दिसत नाही .
  • उद्धव ठाकरे यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेतील वक्तव्याने आम्ही कमालीचे नाराज झालो . सर्व पर्याय आमच्यासमोर असल्याचा उद्धव ठाकरे यांनी दिला होता इशारा.
  • सर्वांचे मनःपूर्वक आभार.
  • सरकार भाजपचेच येणार . पुन्हा निवडणूक व्हाव्यात या मताचे आम्ही नाहीत.
  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांवर खालच्या शब्दांत टीका करण्यात आली
  •  आम्ही आमची मर्यादा कधीही ओलांडली नाही
  •  युती नसतानाही उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्याविरुद्ध कधीही काही बोललो नाही
  • मात्र, भाजप पक्ष जोडणारा आहे. तोडणारा नाही
  • सर्व वक्तव्यांना जशाच तसे उत्तर देण्याची भाजपमध्ये क्षमता
  • प्रसारमाध्यमातील वक्तव्यातून सत्ता स्थापन करता येत नाही
  • भाजपपेक्षा काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करण्याचे शिवसेनेचे धोरण अयोग्य
  • निकालादिवशीच शिवसेनेची भूमिका नक्की झाली
  • सत्ता स्थापनेसंदर्भातील तिढा शिवसेनेमुळे वाढला
  • उद्धव ठाकरे यांना अनेकदा फोन केले. मात्र, त्यांनी घेतले नाहीत
  • फॉर्म्युल्याबद्दलचे मुद्दे चर्चेतून सोडणे अपेक्षित होते
  • महायुतीचं सरकार बनवू, असे म्हटले होते
  • अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्याबद्दल माझ्यासमोर कधीही बोलणे झाले नाही
  • शिवसेनेकडून अशी भूमिका मांडण्यामागचे कारण समजले नाही
  • पर्याय खुले असल्याची शिवसेनेची भूमिका धक्कादायक
  • विधानसभेत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष
  • लढलेल्या जागांपैकी ७० टक्के जागा जिंकल्या. आमचा स्ट्राइक रेट चांगला
  • अनेक प्रलंबित असलेले प्रकल्प मार्गी लावले
  • गेली पाच वर्षे जनतेची सेवा करायला मिळाली, याबद्दल जनतेचे आभार
  • देवेंद्र फडवणीस यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठी भाजप -सेना -काँग्रेस -राष्ट्रवादीच्या स्वतंत्र बैठका चालू असून अद्याप कुठलाही मार्ग निघत नसल्याने पेच कायम असल्याचे चित्र आहे . विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. या दोन्हीही पक्षांच्या भूमिकेमुळे  सत्तेची कोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीने  प्रयत्न सुरू असून आता मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

दरम्यान दिवाळी नंतर क्वचितच बोललेले मुख्यमंत्री ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन पक्षाची अधिकृत भूमिका सांगतील असे वृत्त आहे.

एका वृत्त वाहिनीने दिलेल्या बातमीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः संभाजी भिडे यांनी मातोश्रीवर भेट घेण्यास येण्याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या आठवड्याभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना तीनवेळा फोन केला. मात्र, उद्धव ठाकरे यांनी एकदाही त्यांच्याशी चर्चा केली नाही.

या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा ज्यावेळी कॉल केला तेव्हा उद्धव ठाकरे दुसऱ्या कॉलवर असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर दुसऱ्यावेळी पुन्हा मुख्यमंत्री फडणवीस यांनी कॉल केला त्यावेळी उद्धव ठाकरे विश्रांती घेत असल्याचं उत्तर मिळालं. यानंतरही फडणवीस यांनी तिसऱ्यांदा उद्धव ठाकरे यांना कॉल केला. यावर पुन्हा उद्धव ठाकरे स्वत: फोन करतील असं उत्तर देण्यात आलं.

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चेसाठी दोघांचा मित्र असलेल्या एका उद्योजकानेही  प्रयत्न केले. पण त्यांना राजकारणावर चर्चा करू नये असं सांगण्यात आलं. ‘शिवसेनेला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. सर्व कथित आणि तथाकथित मध्यस्थांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा निरोप आहे की कुणीही मध्यस्थी करू नये. हा विषय भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमधला आहे, यात तिसऱ्याने मधे पडण्याची गरज नाही,’ असं म्हणत संजय राऊत यांनी संभाजी भिडे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे.

आज दिवसभरात घडलेल्या महत्वाच्या घडामोडी अशा आहेत….

‘राज्यातील जनतेनं भाजप-शिवसेनेला सरकार स्थापनेचा कौल दिला आहे. त्याबाबतचा निर्णय त्यांनीच घ्यायला हवा. आम्ही तो पेच सोडवू शकत नाही. त्यांनीच समंजसपणा दाखवायला हवा,’ असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

आजच्या दिवसात भाजप-शिवसेनेतील वादावर तोडगा न निघाल्यास फेरनिवडणूक होऊ शकते का असं विचारलं असता ती शक्यता पवारांनी फेटाळली. ‘राज्यपाल याबाबत निर्णय घेतील. फारतर राष्ट्रपती राजवट लागू शकते. अर्थात, तो निर्णय राज्यपालांचा असेल. त्यावर मी भाष्य करू शकत नाही,’ असंही पवार म्हणाले.

  •  शिवसेनेनं आघाडीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांचा नवा फॉर्मुला
  • भाजपला सत्तेपासून लांब ठेवायचं असेल तर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला बाहेरून पाठिंबा देऊन सरकार बनवण्यास मदत करावी, असा नवा फॉर्म्युला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांनी मांडला होता. त्याबाबत शरद पवार यांना विचारले असता, ‘काँग्रेसला शिवसेनेचा पाठिंबा चालणार आहे का,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.
  • उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील: एकनाथ शिंदे
  • रिपब्लिकन नेते रामदास आठवले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला
  • हिरामण खोसकर यांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न झाला; राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा वडेट्टीवारांच्या आरोपाला दुजोरा
  • आमदारांच्या खरेदी-विक्रीचे भाजपवर होणारे आरोप खोटे; काँग्रेसनं ४८ तासांत पुरावे द्यावेत, अन्यथा माफी मागावी – मुनगंटीवार यांची मागणी
  • मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्षे असे काही ठरलेलेच नव्हते : नितीन गडकरी.
  • शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम , पेच कायम.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!