Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra : भाजप- सेनेचे ” टॉम अँड जेरी “चे भांडण आणि शेजारी काँग्रेस -राष्ट्रवादीची ” बिन मांगे ” मदत करण्याची तयारी …

Spread the love

नवीन सत्ता बदलाच्या खेळात काँग्रेस बरोबर असल्याशिवाय काहीही होणार नाही , हे लक्षात घेऊन एकूणच काँग्रेस नेतृत्वाचा राग रंग पाहता शरद पवार यांनी स्वतः अंग काढून घेतले असले तरी पवारांच्या या खेळीला बळी पडून शिवसेनेचा काँग्रेसकडे कुठलाही प्रस्ताव नसताना पुन्हा एकदा राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी उचल खालली असून हे नेता गण पुन्हा एका शिवसेनेला पाठिंबा द्यावा म्हणून दिल्लीवारीला निघाले आहेत. किमान शरद पवार यांच्याकडे शिवसेनेची ” पॉवर ऑफ ऍटर्नी ” तरी होती आणि आहे पण सोनिया गांधी यांना भेटायला निघालेल्यांच्या हातात काहीच नाही हे विशेष !!

खरे तर भाजप -सेनेचे भांडण हे ” टॉम अँड जेरी ” च्या कार्टूनसारखे एका घरातील आपल्या हक्कांसाठी चाललेले भांडण आहे . शेजाऱ्यांनी त्यांच्या भांडणात पडण्याचा कायदा आलेला असला तरी अद्याप त्यांचे भांडण इतके विकोपाला गेलेले नाही . आणि सर्वांनीच हे लक्षात घेणे गरजेचे आहे कि , सेना -भाजप हे हिंदुत्ववादाच्या नाळेने जोडलेले संयमी जुळे आहेत. त्यांना विभक्त करणे सहजा सहजी शक्य नाही. कारण सयामी जुळ्यांना वेगळे कारण्याचा प्रयत्न केल्यास ते मारू शकतात याही जाणीव त्यांना आहे त्यामुळे कोणाची कितीही इच्छा असली तरी तुटेपर्यंत ते ताणणार नाहीत हेच खरे आहे.

अशोक चव्हाण म्हणतात भाजपाला जनतेचा कौल नाही…

विधानसभा निवडणुकीत भाजप सेना महायुतीला सरकार बनविण्याचा जनमताचा स्पष्ट कौल असताना ,  काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे कि , विधानसभा निवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिलेला नाही. त्यामुळे त्यांचं सरकार येता कामा नये असं आमचं मत आहे, असं सांगतानाच शिवसेनेने निर्णय घ्यावा. त्यांनी युतीतून बाहेर पडावं. तरच आम्हाला पुढे जाता येईल, असं सूचक विधान अशोक चव्हाण यांनी आज केलं.

म्हणजे आता अशोक चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार शिवसेनेने एनडीए मधून बाहेर पडावं . म्हणजे त्यांना पाठिंबा देता येईल जेंव्हा कि शिवसेनेच्या कोणत्याही नेत्याने काँग्रेसकडे पाठिंबा मागितला नाही तरीही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निकालाच्या पहिल्या दिवसापासून म्हणताहेत कि आम्ही शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार आहोत. त्यानंतर पवारांनी सोनिया गांधी यांच्याकडे शिवसेनेच्या पाठिंब्यासाठी आपल्या पद्धतीने चाचपणी करून पाहिली परंतु सोनिया गांधी यांचा एकूण राग रंग लक्षात घेता पवारांनी दिल्लीतून काढता पाय घेतला.

आणि आता एकदा हाच विषय घेऊन गेलेले आणि रिकाम्या हाताने परत आलेले राज्यातील काँग्रेसचे नेते पुन्हा तोच प्रस्तावाचा तांब्या घेऊन दिल्लीला निघायचे म्हणायचे म्हणत आहेत. हे खरे आहे कि , राज्याच्या राजकारणातून भाजपला बाजूला सारण्याची हीच ती योग्य वेळ हि , राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांची सुप्त इच्छा असेलही , पण या इच्छेला शिवसेनेने प्रतिसाद तर द्यायला हवा . अर्थात सेनेचा हा प्रतिसाद शरद पवारांना आहे कारण शरद पवार हे सेनेचे मानद पालक आहेत आणि ते शिवसेनेच्या हाकेला केंव्हाही धावून जाऊ शकतात कारण त्यांचा ५४ आमदारांचे ते कर्ते करविते आहेत . तर काँग्रेसची दारोमदार सोनिया गांधी यांच्या मनावर आहे . आणि सोनिया गांधी यांचा पाठिंबा म्हणजे “उचलली जीभ आणि लावली टाळूला ” इतका सोपा असेल का ? हा साधा प्रश्न आहे.

सेनेने मदत न मागताही काँग्रेस नेते पुन्हा सोनियांच्या भेटीला…

दरम्यान चव्हाण यांच्या मतानुसार , राज्यात परिवर्तन घडून आणायचं की नाही, हे सर्वकाही शिवसेनेच्या हातात आहे. शिवसेनेने निर्णय घेतला तरच राज्यात सत्ता परिवर्तन होऊ शकते. बिगर भाजपा मुख्यमंत्री असावा ही काँग्रेसची मानसिकता आहे. त्यावर सेनेने विचार करावा, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते गेल्या आठवड्यात सोनिया गांधी यांना भेटले होते. मात्र त्या बैठकीत सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यास अनुकूल नव्हत्या. मात्र दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीतही त्यांचा प्रतिसाद नकारात्मकच होता तरीही  पुन्हा काँग्रेसचं एक शिष्टमंडळ उद्या सोनिया यांची भेट घेणार असून शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्याकडे आग्रही मागणी करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या शिष्टमंडळात आमदारांचाही समावेश असल्याचं सांगण्यात येतं.

आता दृश्य असे आहे कि , काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेच्या मागे ” आमचा पाठिंबा घ्या , आमचा पाठिंबा घ्या म्हणून स्वतःच  हलगी वाजवत पोतराजासारखा स्वतःच्या अंगावर आसूड मारून घेण्याचा खेळ करीत लोकांचे मनोरंजन करीत आहेत . आणि वर माढ्यातील लोक लिहिताहेत कि , शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा देण्याचा कोणताही निर्णय हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळूनच घेईल, असं चव्हाण यांनी थेट वक्तव्य केल्याने शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी नवी समीकरणं राज्यात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे !!

आपलं सरकार

Click to listen highlighted text!