Current News Update : शिवसेनेची बैठक संपली , मुख्यमंत्रीपदावर शिवसेना ठाम , सर्व आमदारांचा तूर्त मुक्काम “रंग शारदा “

Advertisements
Advertisements
Spread the love

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.  राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भाजपच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केली आहे.

Advertisements

मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली  ही बैठक पार पडली. सत्तेतल्या ५०-५० टक्के वाट्यावर शिवसेना अजूनही ठाम असल्याचे दिसते. लोकसभेच्या वेळी युतीचं जे ठरलं होतं, तसंच व्हावं याचाच पुनरुच्चार या बैठकीत झाला, अशी माहिती या बैठकीनंतर आमदार शंभूराजे देसाई यांनी प्रसारमाध्यमांना दिली. शिवसेना पक्ष  प्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण असू अशी ग्वाही या आमदारांनी उद्धव ठाकरे यांना या बैठकीत दिली. आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेश नाहीत, त्यांना पुढील निरोप येईपर्यंत रंगशारदा येथेच थांबायचे आहे.

Advertisements
Advertisements

शिवसेनेचे ५६ आमदार अधिक शिवसेनेला पाठिंबा देणारे आठ आमदार असे एकूण ६४ आमदार मातोश्रीहून रंगशारदा येथे गेले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत वांद्रे येथील या हॉटेलमध्ये हे सर्व आमदार थांबणार आहेत.

आपलं सरकार