Aurangabad News Update : केंद्र राज्याने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले : ऍड . विष्णू ढोबळे यांचा आरोप

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाने शेती क्षेत्रात आणिबाणी ची परिस्थिती असताना केंद्र आणि राज्य सरकार आणीबाणीच्या परिस्थिती वर कोणत्याही ठोस उपाय योजना करत नसल्याचे मत समाजवादी जनपरिषदेचे राज्याध्यक्ष ऍड.विष्णू ढोबळे यांनी व्यक्त केले आहे.

Advertisements

ऍड . ढोबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एक पत्रकात म्हटले आहे की, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात पावसाळी संकटाने हाहाकार उडालेला आहे. राजकीय सत्तेच्या गणितापेक्षा ग्रामीण शेतकरी संकटावर उपाय योजना आवश्यक होत्या.परंतु केंद्र आणि राज्यकडून शेती आणि शेतकरी समाजाच्या प्रश्नांना दुर्लक्षित केले जात असल्याचे चित्र आहे.असे ढोबळे म्हणाले. महाराष्ट्राच्या अस्थिर राजकिय परिस्थिती विषयी सजप ला चिंता वाटत असल्याचे सांगून ते म्हणाले, राज्यात अस्थिर राजकारणामुळे संकट काळात राज्यकर्त्या कडून लोकांना आधार वाटेल आणि शेतकऱ्यांची उजाड झालेली शेती आणि संसार याला आधार होईल अशी तातडीची आर्थिक उपाय योजना आवशक असल्याचे ढोबळे यांनी म्हटले आहे.सरकारी यंत्रणा विमा कार्यालये,मंत्री,अद्यापि गोंधळलेल्या परिस्थिती त दिसत असून शेतकऱ्यांना नेमकी किती मदत घ्यावी याची दिशा निश्चित ठरत नाही ही बाब गंभीर असून पंचनाम्याच्या फायली उत्तम प्रकारचा वेळकाढू पणा आहे प्राप्त संकटकाळात केंद्र आणि राज्यसरकार ने पुढाकार घेऊ न शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून हेक्टरी किमान 3 लाख रुपये द्यावेत पैकी दीड लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. अन्यथा देशातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या महाराष्ट्रात हे संकट अधिक वाढेल. असे ढोबळे यांनी म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार