Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad News : व्हिडीओकॉनच्या विरोधात मोर्चा काढणाऱ्या कर्मचा-यांना अटक

Spread the love

औरंंंगाबाद : हाताला काम द्या, पगार द्या अशी मागणी करीत रस्त्यावर उतरलेल्या व्हिडीओकॉन कंपनीतील  ३४० मोर्चेकरी कर्मचा-यांना गुरूवारी (दि.७) पोलिसांनी ताब्यात घेतले. गेल्या ७० ते ७५ दिवसापासून उपोषणाला बसलेल्या कामगारांची आंदोलनाची दखल न घेणा-या व्हिडीओकॉनकंपनीचे  मालक धुत यांच्या बंगल्यावर व्हिडीओकॉन गु्रप एम्पलॉईज युनियनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
हाताला काम द्या, पगार द्या अशी मागणी करीत व्हिडीओकॉन ग्रुप एम्पलॉईज युनियनच्या ३४० सदस्यांनी गुरूवारी सकाळी साडेअकरा वाजता क्रांतीचौकातून मोर्चा काढला होता. गुलमंडी, पैठणगेट, क्रांतीचौक, रेल्वेस्टेशन मार्गे हा मोर्चा व्हिडीओकॉन कंपनीचे  मालक धुत यांच्या बंगल्यावर जावून धडकणार होता. गुलमंडी येथून काम दो, वेतने दो अशा जोरदार घोषणा देत कर्मचा-यांनी गुलमंडी येथून मोर्चास सुरूवात केली होती. परंतु पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली नसल्याने पोलिसांनी मोर्चकरी कर्मचा-यांना ताब्यात घेतले.

यावेळी व्हिडीओकॉन ग्रुप एम्पलॉईज युनियनचे अध्यक्ष गजानन खंदारे, सचिन जाधव, मनोज पवार, रामेश्वर पवार, साईनाथ ठेंगडे, कलीम खान, जब्बार खान, शेख जाकेर मोहम्मद, अप्पासाहेब वैद्य, रामनाथ जगदाळे, सुनिल गि-हाणे, भरत भुसारे, रवींद्र त्रिभुवन, भाऊसाहेब भालेराव, अ‍ॅड. अभय टाकसाळ आदी मोर्चेक-यांना पोलिसांनी अटक केली. व्हिडीओकॉन वंâपनीतील कर्मचा-यांच्या मागण्याकडे शासन लक्ष द्यायला तयार नाही तसेच लोकप्रतिनिधी देखील कर्मचा-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे कर्मचा-यांवर उपासमारीची वेळ आली असल्याची खंत यावेळी मोर्चेकरी कर्मचा-यांनी बोलून दाखवली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!