Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : महाराष्ट्राचे राजकारण : तातडीच्या नागपूर दौऱ्यात , सरसंघचालकडून कुठला ‘गुरुमंत्र’ घेऊन मुंबईत परतले फडणीस ? जाणून घ्या…

Spread the love


उपलब्ध माहितीनुसार मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत ठरले ते असे कि…

१. कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाबाबत तडजोड करू नये .

२. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेशी बोलणी करावीत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप एक जीव असल्याने शक्यतो सेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. आणि ते जात ऐकतच नसतील तर

३. राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा नव्याने निवडणूक घ्याव्यात काय ?

३. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याबाबत किंवा सेनेचे जे आमदार भाजपसोबत येण्यास तयार असतील त्यांना सोबत घेण्यासंबंधी विचार करावा काय ?


विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यात शिवसेनेने मुख्यमंत्री पदाच्या वादातून निर्माण केलेल्या अडथळ्याची शर्यत जिंकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दौरे वाढले असून दिल्ली , मुंबई असा मोठा दौरा करून मुख्यमंत्र्यांनी आज रात्री नागपूर गाठून रेशीम बागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी सर्व पर्यायावर चर्चा करून पुन्हा मुंबई गाठली आहे. फडणवीस व भागवत यांच्यात  बंद दाराआड अर्धा ते पाऊण तास झालेली चर्चा काय असेल ? आणि या चर्चेत सरसंघचालकांकडून फडणवीस यांना कोणता गुरुमंत्र  मिळला असेल हे फडणवीस यांच्या कृतीतूनच स्पष्ट होईल हे मात्र नक्की. यावेळी संघाचे महासचिव भैयाजी जोशी यांचीही उपस्थिती होती.

राज्याचे विधानसभेचे निकाल हाती आल्यानंतरही सरकार स्थापन होत नसल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धावपळ सुरु आहे . दिल्लीतील नेत्यांच्या सल्ल्यानंतर फडणवीस यांनी संघाचे मुख्यालय गाठून ज्या पर्यायावर चर्चा केली त्यात प्रामुख्याने त्यांनी १. कुठल्याही परिस्थितीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपदाबाबत तडजोड नाही. २. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेशी बोलणी करावीत. ३. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेण्याबाबत विचार करावा काय ? ४. शिवसेना ऐकायलाच तयार नसेल तर राष्ट्रपती राजवट आणि पुन्हा नव्याने निवडणूक घ्याव्यात काय ? या प्रमुख मुद्यांवर चर्चा झाली यापैकी पहिल्या , दुसऱ्या आणि चौथ्या मुद्यावर संघप्रमुखांनी आपली संमती दिली असून जनादेश हुंदुत्वाच्या बाजूने असल्याने शिवसेनेचे मन वळवावे अन्यथा  नव्याने निवडणुकांना सामोरे जावे याकडे त्यांचा कल असल्याचे दिसून आले असे सूत्रांचे म्हणणे असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाईम्स ने दिले आहे.

दरम्यान अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदासह सत्तेत समान वाटा मिळायला हवा, या मागणीवर शिवसेना ठाम आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १२ दिवस उलटले तरीही राज्यातील सत्तास्थापनेची कोंडी फुटू शकलेली नाही. शिवसेनेसोबत मुख्यमंत्रिपद शेअर करण्यास भाजपने स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार येणार, असे भाजप नेते पुन्हा पुन्हा सांगत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणूक एकत्र लढणारे भाजप व शिवसेना हे दोन्ही पक्ष सत्तेच्या डावात एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे ठाकले आहेत.

राज्यात शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवारी  मुख्यमंत्री सर्वप्रथम दिल्लीतील नेतृत्वाच्या भेटीला गेले. दिल्लीत सोमवारी फडणवीस यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री व महाराष्ट्रातील राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या नितीन गडकरी यांचीही फडणवीस यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी फडणवीस रात्री उशिरापर्यंत दिल्लीत थांबले होते. मात्र ही भेट होऊ शकली नाही.

दिल्लीतून मुंबईत परतल्यानंतर फडणवीस यांनी मंगळवारी  राज्यातील नेत्यांशी नव्याने चर्चा केली त्यानुसार  मुंबईत भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला. बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच महायुतीचं सरकार स्थापन होणार, असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी शिवसेनेने प्रस्ताव द्यावा. चर्चेसाठी आमचे दरवाजे २४ तास उघडे आहेत, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र, त्यावर लगेचच शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत, जे ठरलंय त्याबाबत लेखी हमी दिल्याशिवाय भाजपशी कोणतीही चर्चा होणार नाही, असे ठणकावून सांगितले. त्यामुळे भाजपची कोंडी कायम राहिली आहे.

दरम्यान आज दिवसभरातील घडामोडींतून काहीच ठोस मार्ग निघाला नसल्याने रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस थेट नागपुर गाठून संघ मुख्यालयात फडणवीस यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेऊन सुमारे दीड तास चर्चा केली. या चर्चेनंतर फडणवीस माध्यमांना टाळून थेट विमानतळाच्या दिशेने रवाना झाले आणि रात्री उशिरा मुंबईत पोहोचले.

सांगण्यात येते कि , केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच  फडणवीस सरसंघचालकांच्या भेटीला गेले होते. त्यांनी राज्यात निर्माण झालेल्या सत्तास्थापनेच्या कोंडीबाबत सरसंघचालकांना माहिती दिली. त्याचवेळी विविध पर्यायांवर भागवतांशी चर्चा केली व त्यांचा सल्ला घेऊन ते मुंबईत दाखल झाले . आज त्यांची काय भूमिका राहील ? हे स्पष्ट होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!