Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : पवारांनी केले हात वर , म्हणाले…भाजप -सेनेनेच करावे स्थापन सरकार !!

Spread the love

भाजप आणि शिवसेना  यांची  गेल्या २५ वर्षांपासूनची  युती आहे. आम्हाला जनतेने कौल दिलेला नाही. एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला महाराष्ट्रात बसायचं आहे कारण जनतेने सत्तेचा कौल युतीला दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि हा पेच संपवावा असे आवाहन करताना शरद पवार यांनी , राष्ट्रपती राजवट लागू होईल ही भीती फक्त शिवसेनेला वाटते आहे असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

भाजप सेनेची २५ वर्षे युती सडली असं उद्धव ठाकरे म्हटले होते त्याबाबत काय भाष्य कराल असा प्रश्न जेव्हा शरद पवार यांना विचारण्यात आला तेव्हा २५  वर्षे सडले तरीही एकत्र लढले असं उत्तर दिलं ज्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. भाजपा आणि शिवसेना यांनाच जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे त्यांनीच सरकार स्थापन करावं बाकी याबाबत बोलण्यासारखं काहीही नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दिल्ली दौऱ्याहून परतल्यानंतर शरद पवार मुंबईत आयोजित  पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपा आणि शिवसेना युतीला जनतेने कौल दिला आहे. त्यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन करावं आणि आम्हाला जबाबदार विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी  असे शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले . संजय राऊत यांनी १७० चा आकडा कुठून आणला ते माहित नाही. आज त्यांनी माझी जी भेट घेतली ती सहज भेट होती. त्यांची आणि माझी भेट कायमच सकारात्मक होते तशी ती आजही झाली. वेगळं समीकरण असण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीहून परतल्यानंतर महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यावर शरद पवार काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. मात्र आपल्याकडे कोणीही प्रस्ताव घेऊन आलेलं नाही. तसंच संख्याबळ असतं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही सरकार स्थापन केलं असतं. तसं ते झालेलं नाही, लोकांनी त्यांचा निर्णय दिला आहे. आता भाजपा आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं आणि आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करण्याची संधी द्यावी असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!