Current News Update : मोठी बातमी : महाराष्ट्रात येते आहे महायुतीचे सरकार , येत्या २४ तासात होणार शपथविधी…. ?

Spread the love

महाराष्ट्रात कोणाचे सरकार येईल यावरून सर्वत्र चर्चा मुद्दाम चालविण्यात येत होत्या हे स्पष्टच आहे . महायुतीला सरकार बनविण्याचा कौल मिळाल्यानंतर सहजा सहजी सरकार बनविण्यास शिवसेना तयार झाली असती तर सेनेच्या पदरात अधिकचे काहीही पडले नसते आणि पुन्हा दुय्यम भूमिकेवर पाच वर्षे सेनेला भाजपसोबत मागच्यासारखीच काढावी लागली असती. त्यामुळे यावेळी शिवसेनेने भाजपाला चांगलेच जेरीस आणले . अक्षरशः शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांचा घाम निघाला . या धावपळीत त्यांना खरे तर आपले वजन कमी करण्याची आयटी संधी चालून अली याबद्दल त्यांनी सेनेचे आभारच मानले पाहिजेत. आता व्हायचे ते होऊन गेले आहे . पडद्यामागून बऱ्याच हालचाली घडून गेल्या आणि आता महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार हे नक्की झाले आहे . त्याची फक्त औपचारिक घोषणाच होणे बाकी असून येत्या २४ तासात शपथविधी होईल अशी खात्रीशीर बातमी आहे.

अर्थात हे सर्व ठरलेले होते आणि यावर महानायक ऑनलाईनने सातत्याने या सर्व बातम्यांची मांडणी केली होती. त्यामुळे या सर्व धामधुमीत ” गाढवं मेली ओझ्याने आणि शिंगरं मेली येरझऱ्यांनी अशीच सर्वांची अवस्था झाली आहे .

उद्धव ठाकरेंचा पवारांना फोन ….

गेल्या १३ दिवसांपासून शिवसेनेने भाजपच्या तोंडचे पाणी पळवले होते . अर्थात या खेळात पवारांनी लक्ष घातले होते हे खरे आहे पण काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने शिवसेनेला महायुतीसोबत जाण्यावाचून कुठलाही पर्याय राहिलेला नाही. दरम्यान आज दुसऱ्यांदा पवार आणि राऊत यांची १० मिनिटांची भेट केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचे फोनवर बोलणे करून देण्यासाठी होती असेच म्हणजे लागेल आणि हा फोन यासाठी असावा  कि , ” धन्यवाद !! आपल्या सहकार्याबद्दल !!” अर्थात पवारही म्हणत असतील ” स्वारी , नाही जमू शकत , आणि आपल्याकडे आकडे नाहीत , त्यामुळे तुमचा ठरलंय . तसं चालू द्या. खूप खूप शुभेच्छा . काही अडचण आली तर मी आहेच . गो अहेड…आलं दि बेस्ट ”  फोन कट आणि संजय राऊत बाहेर . याशिवाय “सिल्व्हर ओक ” वर काहीही वेगळे घडले नसेल हे मात्र नक्की.

…आणि मग झाली पवारांची पत्रकार परिषद 

त्यानंतर पवार साहेबांची पत्रकार परिषद. युतीने सरकार बनवावे . त्यांना जनतेचा कौल मिळालेला आहे . बाकी सगळी पत्रकार परिषद आपणास माहीत आहे. मुळात शरद पवार यांचीही शिवसेनेला हातभार लावून शिवसेना -काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नवे सरकार अशी इच्छा होती आणि ते सहज शक्यही होते परंतु यासाठी सेना असे करण्यास पूर्णतः तयार नव्हती म्हणजे ठामपणे ते शरद पवार यांना तसे बोलले नाही त्यामुळे पवार काँग्रेसचा पाठिंबा मिळविण्यासाठी फारसे आग्रही राहिले नाही. कारण शिवसेनेचे भाजपसोबतचे भांडण केवळ काही मागण्यांचे होते आणि त्या मागण्या पदरात पडून घेण्यासाठी त्यांचा हा “गेम ” चालू होता. याची कल्पना भाजपलाही होतीच पण बऱ्याचदा काही गोष्टी ” खेल खेल ” मे होऊन जातात हे माहित असल्यामुळे भाजप कुठलीही रिस्क घयायला तयार नव्हती त्यामुळे सत्तेसाठी वाट्टेल ते करण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नव्हता.

रेशीमबाग कनेक्शन आणि देवेंद्र फडणवीस 

दरम्यान हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे तो मराठी लोकच सोडवू शकतात असे मोदी-शहा यांना वाटल्याने त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या प्रकरणात पुढाकार घ्यावा असे संगनमताने ठरल्याने भाजपच्या राष्ट्रे नेतृत्वाने आपले अंग झटकून टाकले कारण मोदी आणि शहा हे जाणून आहेत कि , या मराठी माणसांच्या भांडणात आपण गुजराती माणसांनी पडणे व्यर्थ आहे . त्यामुळे रेशीम बागेतील आपले पितृतूल्य नेतेच हा प्रश्न सोडवू शकतात आणि होतेही तसेच आहे. बाकी कोण कुणाला भेटले या चर्चा वांझोट्या आहेत . म्हणजे अहमद पटेल -गडकरी भेट , हुसेन दलवाई -राऊत भेट , यशोमती ठाकूर -पवार भेट यात कुठलेही तथ्य नाही .

दरम्यान शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांसमवेत शिवसेना नेत्यांच्या झालेल्या भेटी  या सर्व पार्श्वभूमीवर महत्वाच्या होत्या . आता कुठल्याही क्षणी महायुतीचे अखेर जमले अशी बातमी येऊ शकते . नाही तरी संभाव्य मंत्र्यांच्या याद्या दोन्हींकडेही तशा तयारच आहेत आणि कुणाला फोन करून बोलाविण्याची गरजही नाही कारण जवळपास सर्व मुख्य आमदार दिवाळीपासून मुंबईतच तळ ठोकून आहेत.

मोदी -शहांची महाराष्ट्रावर नाराजी 

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बहुसंख्य सभा घेऊनही अपेक्षित निकाल न आल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  केंद्री गृहमंत्री तथा भाताचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा नाराज झाले आहेत . खासकरून स्वतः सभेला येऊनही साताऱ्यात  उदयनराजे भोसलेंचा  तर परळीत पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव, १०५ पर्यंत गेलेल्या जागा हि या नाराजीची कारणे आहेत . त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा पेच संघ प्रमुखांनीच सोडवावा या विषयावर भाजप नेतृत्वाचे एकमत झाले आणि काल रात्री ठरल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जाऊन संघ प्रमुख मोहन भागवत यांची भेट आणि आशीर्वचन घेतले आणि त्यांनी महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या स्थापनेची तयारी केली . आज रात्री सर्व चर्च होऊन उद्या नव्या सरकारचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

  • बाबा गाडे 

 

 

आपलं सरकार