महिला तहसीलदाराला रॉकेल टाकून जिवंत जाळले !! आरोपी फरार …

Spread the love

तेलंगणामधील रंगारेड्डी जिल्ह्यात एका तहसीलदार महिलेस चक्क तिच्या कार्यालयात जाऊन जिवंत जाळल्याची खळबळजनक घटना घडली असून पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले कि , तहसीलदारांना भेटायचे आहे, असे सांगून एक व्यक्ती कार्यालयात घुसला होता. यानंतर त्याने तहसीलदार विजया रेड्डी यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले व घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेत तहसीलदार विजया  गंभीररित्या जळाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, विजया यांना पेटवून देण्यात आल्याचे समजताच कार्यालयातील अन्यकाही जणांनी त्यांच्या कक्षाकडे धाव घेतली, त्यातील दोघांनी विजया यांना लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न देखील केला. यात ते दोघेही भाजल्या गेले, त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

आपलं सरकार