Aurangabad Crime : अभियंता पती -पत्नीची परस्परांविरुद्ध मारहाण व छळाची तक्रार

Advertisements
Advertisements
Spread the love

पत्नी व तिच्या माहेरच्या लोकांनी येऊन मारहाण करून  व जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद अभियंता पटीने आपल्या अभियंता पत्नीच्या विरोधात दिली आहे . दरम्यान पत्नीनेही पतीच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार हर्सूल पोलीस ठाण्यात दिली आहे.

Advertisements

या प्रकरणात पटीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि , त्याच्या पत्नीचा व त्याचा वाद कौटुंबिक न्यायालयात सुरु होता दरम्यान न्ययालयात समेट घडून आल्यानंतर दोघेही एकत्र राहत होते . पत्नी मोंगल हि एका खासगी कंपनीत कार्यरत आहे . त्यान्ना एक ४ वर्षाचा मुलगाही आहे. त्याची पत्नी कायम त्याच्याकडे संशयाने पाहते  आणि मुलालाही माझ्या विरोधात सांगते त्यावर मी तिला असे का करते म्हणून विचारले तेंव्हा ४ नोव्हेंबर रोजी ती घर सोडून माहेरी निघून गेली आणि तिच्या माहेरच्या लोकांना घरी आणून मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.

Advertisements
Advertisements

दरम्यान पत्नी मोनल हिनेही पतीच्या विरोधात मारहाणीची व छळाची तक्रार दिली असून  दोन्हीही प्रकरणात पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपस चालू आहे. मोनल (३०)आणि संगपाल अवचार(३१) रा.साफल्यनगर हर्सूल दोघेही  इंजिनिअर असून २०१४ मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे . त्यांना शौर्य नावाचा ४ वर्षाचा मुलगा आहे .

आपलं सरकार