Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : शहरवासीयांनी सर्वाच्च न्यायालयाच्या निकालाचा सन्मान करावा, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांचे आवाहन

Spread the love

पुढील आठवड्यात रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल

औरंंंगाबाद : पुढील आठवड्यात रामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वाच्च न्यायालय जाहीर करणार आहे. या निकालाचा शहरवासीयांनी सन्मानाने स्विकार करून शहरात कायदा, सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवावी असे आवाहन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी मंगळवारी (दि.५) पत्रकार परिषदेत केले. दरम्यान, न्यायालयाच्या निकालाचा सन्मान न करणाNयावर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
रामजन्मभूमी असलेल्या अयोध्येतील वादग्रस्त जागेचा निकाल पुढील आठवड्यात १२ ते १७ नोव्हेंबरदरम्यान सर्वाच्च न्यायालय जाहीर करणार आहे. या निकालानंतर कोणत्याही समाजाच्या नागरीकांनी जल्लोष करू नये, कोणत्याही समाजाच्या धार्मीक भावना दुखावतील असे व्हीडीओ क्लीप, फोटो, संदेश सोशल मिडियावर व्हायरल करू नयेत असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे. गेल्या सहा ते सात महिन्याच्या काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. निवडणूकीच्या काळात शेकडो गुन्हेगांरावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या होत्या, त्यामुळेच निवडणूका शांततेत आणि निर्विघ्नपणे पार पडल्या असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, अयोध्येतील वादग्रस्त निकालाच्या पाश्र्वभमीवर शहरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाNयावर पोलिसांचे लक्ष असून सोशल मिडियावरील विविध व्हॉटसग्रुप, पेâसबुकवरही पोलिसांचे लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोशल मिडियावरून आक्षेपार्ह संदेश, व्हीडीओ व्हायरल करणाNयावर भादंवि १८८ नुसार आणि सायबर अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितले. यापत्रकार परिषदेस पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, डॉ. राहुल खाडे, मिना मकवाना, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे आदींची उपस्थिती होती.

पोलिसांकडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध

पोलिस आयुक्तालयाकडे सध्या पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध आहे. त्यात पोलिस उपायुक्त-३, सहाय्यक आयुक्त-७, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक असे २०० अधिकारी, ३ हजार ५०० कर्मचारी उपलब्ध आहेत. तसेच लवकरच शहरात राज्य राखीव दल आणि वेंâद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकड्या शहरात दाखल होणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले. तसेच पोलिसांकडे ड्रोन वॅâमेरेदेखील उपलब्ध असून त्याचा देखील आपत्कालीन परिस्थितीत वापर करण्यात येईल असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!