Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दिल्ली News Update : महाराष्ट्राचे राजकारण : सत्तारोहणाच्या पूर्वतयारीसाठी पवार, फडणवीस यांचा दिल्लीत तळ

Spread the love

पक्ष कोणताही असो, महाराष्ट्रात कोणाचे सरकार येणार ? यांचा निकाल शेवटी दील्लीतच ठरतो, हेच खरे आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे निकाल लागून १२ दिवस उलटत आले तरी महाराष्ट्राचे सरकार ठरलेले नाही. आता हेच ठरविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत.
महाराष्ट्राचे कारभारी ठरविण्यात काॅंग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांची भूमिका शरद पवार यांच्यासाठी महत्त्वाची आहे तर आपल्या मुख्यमंत्री पदाच्या हट्टासाठी पेटलेल्या शिवसेनेला कसे आटोक्यात आणावे ? हे भाजप समोरील मोठे आव्हान आहे. या विषयावर आज दिल्लीत अमित शहा, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी खलबते करणार आहेत. त्यासाठी गरज पडली तर स्वत: मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करु शकतात.
अर्थात आजचा दिवस मावळायच्या आत देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार मुंबईत परतू शकतात.
काॅंग्रेसला घाई नाही…
दरम्यान काॅंग्रेसचे नेते गेल्या आठवड्यात सोनिया गांधी यांना भेटले होते तेंव्हाच सोनिया गांधी यांनी त्यांना वेट अँड वाॅचचा सल्ला दिला होता. त्यामुळे काॅंग्रेस नेतृत्व महाराष्ट्राचा निर्णय लवकर घेण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत आहे.

अर्थात शक्यता काहीही असल्यातरी महाराष्ट्राचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!