पाली घाटात स्कॉर्पिओ उलटून भीषण अपघात , तीन ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर बीडजवळ पाली घाटात स्कॉर्पिओ उलटून झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण ठार झाले आहेत. अपघातातील तिन्ही तरूण बीडच्याच शाहू नगर परिसरातील आहेत.

Advertisements

आज सायंकाळी औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर पाली घाटात हा भीषण अपघात झाला. पाली घाटाजवळ येत असताना ही स्कॉर्पिओ अचानक घाटात कोसळली. घाटाच्याखाली सिमेंटच्या बंधाऱ्यावर ही गाडी आदळल्याने गाडीतील तिन्ही तरुणांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं.

Advertisements
Advertisements

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही चालू आहे.

आपलं सरकार