Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘स्वास्दी पीएम मोदी’ : 370 कालमावरून पंतप्रधान मोदी यांनी बँकॉकही गाजवले…

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकॉकमधील ‘स्वास्दी पीएम मोदी’ या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवणे आणि राज्याचे विभाजनाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांचा आवर्जून उल्लेख करीत अमेरिकेप्रमाणे बँकॉकही गाजवले . या निमित्ताने भारताने  दहशतवाद आणि फुटीरतावादामागील मोठी कारणे  नष्ट केली, असे सांगून ते म्हणाले कि ,  आमचे  सरकार अशक्य वाटणारे लक्ष्य पूर्णत्वास आणण्याच्या दिशेने  काम करत आहे.

या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि , जम्मू-काश्मीरमधून हटवलेले कलम ३७० आणि राज्याचे विभाजन आदी निर्णयांचा उल्लेख केला. ‘भारतानं दहशतवाद आणि फुटीरतावाद यांच्यामागील मोठी कारणं नष्ट करून टाकली आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे. निर्णय योग्य असतात तेव्हा त्याचा डंका संपूर्ण जगात वाजतो, असं त्यांनी सांगितलं. पंतप्रधान मोदींनी कलम ३७० रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. त्यावेळी या टाळ्या भारताची संसद आणि खासदारांसाठी आहेत, असं मोदी म्हणाले.

जे लोक काम करून दाखवतात, त्यांच्याकडून लोकांना खूप अपेक्षा असतात. त्या अपेक्षा वाढत जातात, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी करतारपूर कॉरिडोरचाही उल्लेख केला. आता भाविक करतारपूर साहिब दर्शनासाठी जाऊ शकतात, असं ते म्हणाले. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात उज्ज्वला योजनेसह सरकारनं यशस्वी झालेल्या अन्य योजनांचाही उल्लेख केला. भारतात गेल्या पाच वर्षांत झालेल्या परिवर्तनामुळं जनतेनं या वेळीही सरकारला कौल दिला. भारत आता पाच हजार अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि त्यासाठी कठोर मेहनत घेत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी त्यांनी यावेळी त्यांनी थायलंड आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक संबंधांबद्दल सांगितलं. ‘प्राचीन सुवर्णभूमी थायलंडमध्ये तुमच्यामध्ये आलोय. तुम्ही या सुवर्णभूमिलाही आपल्या रंगात रंगून टाकलंय असं वाटू लागलं आहे. येथील वातावरण, वेशभूषा प्रत्येक अंगानं आपलेपणाची भावना वाटते. यातून आपलेपणाची झलक दिसते. तुम्ही भारतीय वंशाचे आहात म्हणून नव्हे तर, थायलंडच्या कणाकणात आणि जन-जनमध्ये आपलेपणा दिसून येतो. येथील भाषेत, पंरपरा आणि खाद्यसंस्कृतीत भारतीयत्वाचा सुगंध अनुभवायला मिळतो,’ अशा शब्दांत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!