महाराष्ट्राच्या दोन मोठ्या नेत्यांची भेट , १५ ते २० मिनिटे चालली चर्चा…, चर्चेचा तपशील मात्र गुलदस्त्यात !!

Advertisements
Advertisements
Spread the love

नोव्हेंबरच्या हिवाळ्यात राज्यात गरम गरम राजकीय चर्चा झाडात असतानाच राज्यातील दोन मोठे नेते शरद पवार आणि राज ठाकरे यांच्यात महत्वपूर्ण भेट झाली असल्याचे वृत्त आहे परंतु या दोन मोठ्या नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हेच पत्रकारांना समजू शकले नाही .

Advertisements

बातमीमधून समजते कि , महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे. यो दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १५-२० मिनिटं चर्चा झाली. मात्र या भेटीत नेमकं काय झालं हे अद्याप समोर आलेलं नाही.

Advertisements
Advertisements

विधानसभा निकालानंतर प्रथमच राज ठाकरे यांनी पवार यांची भेट घेतली आहे. त्यांनी शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक’  निवास्थानी जाऊन भेट दिली आहे. यावेळी राज ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन आले होते. ही केवळ सदिच्छा भेट होती असे बोलले जात आहे. मात्र, तरी देखील या भेटीनंतर चर्चांना मोठ्या प्रमाणावर उधान आलं असल्याची बातमी आहे.

आपलं सरकार