महाराष्ट्राचे राजकारण : काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांना नवा साक्षात्कार !! त्यांच्या मते “शिवसेना आता हिंदुत्ववादी नव्हे तर सर्वसमावेशक” !!

Advertisements
Advertisements
Spread the love

नव्या सत्ता समीकरणात शिवसेनेला काँग्रेसने पाठिंबा दिल्याशिवाय त्यांचे सरकार कदापी  बनू शकणार नाही  याची जाणीव सेनेला असली तरी याबाबतीत सेना नेते काहीही बोलायला तयार नसताना काँग्रेस -राष्ट्रवादीच्याच नेत्यांची पोपट पंची चालू आहे .

Advertisements

शिवसेनेने आपल्या कट्टर हिंदुत्ववादात कुठलाही बदल केला नाही हे कधीही लपवून ठेवलेले नसताना , काँग्रेस नेते हुसेन दलवाई  यांना मात्र आता शिवसेनेचे हिंदुत्व सर्वसमावेशक झाल्याचा साक्षात्कार झाला आहे. याबाबत त्यांचे स्टेटमेंट आले असून त्यात त्यांनी म्हटले आहे कि ,  पाठिंबा हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेश झाला असून सत्तास्थापनेसाठी शिवसनेकडून पाठिंब्यासाठी प्रस्ताव आल्यास शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा द्यावा,अशी विनंती करणारे पत्र त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पाठवले आहे.

Advertisements
Advertisements

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दलवाई यांनी हे स्पष्ट केले आहे कि , अर्थात काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर हे सरकार ५ वर्षे टिकेल असे प्रयत्न व्हायला पाहिजेत असेही दलवाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. एका खासगी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचेही हुसेन दलवाई यांनी अधोरेखित केले आहे. दरम्यान, काँग्रेसपक्षात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना हा हिंदुत्वाचे राजकारण करणारा पक्ष असून काँग्रेस पक्षाने राज्याच्या राजकारणात शिवसेनेला कायम विरोध दर्शवला आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता.

काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करताना , शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेनं काँग्रेसला जो कौल दिला आहे, त्यानुसार काँग्रेस पक्ष विरोधी बाकावरच बसणार आहे, असे म्हटले होते.

आपलं सरकार