महाराष्ट्राचे राजकारण : अजित पवार म्हणतात “आम्ही विरोधी पक्षात बसणार ” तर “साहेब ” सेनेचे सरकार बनविण्याच्या प्रयत्नात

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्राचे राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार सेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनेत्या सोनिया गांधी  यांची मनधरणी करण्यासाठी तिकडे दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत आणि इकडे राष्ट्रवादीचे गट नेते अजित पवार म्हणतात कि , राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय झाला आहे. आम्ही विरोधी पक्षात बसणार आहोत. आमच्या साहेबांनीच तसं स्पष्ट केलं आहे. आणि साहेबांच्या बातम्या माध्यमात मात्र वेगळ्याच येत आहेत हे विशेष !!

Advertisements

अशा प्रकारे राष्ट्रवादीचे आत एक आणि बाहेर एक चाललेले आहे . विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार राज्यात पुन्हा सत्ता स्थापन करेल असंच चित्र होतं. मात्र, सत्तावाटपात समान वाटा हवा, असं सांगत शिवसेनेनं मुख्यमंत्री पदाची मागणी केली आहे. त्याला भाजपाकडून अद्यापपर्यंत अनुकूल प्रतिसाद आलेला नाही. तर दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये शाब्दिक वाद शिगेला पोहचले आहेत. युतीचं घोडं मुख्यमंत्रीपदावर अडलेलं असताना शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या नव्या राजकीय समीकरणानं जोर धरला आहे. काँग्रसेच्या राज्यातील नेत्यांनीही पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात भेट घेतली होती. त्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले असून, राष्ट्रवादीची भूमिका काय याविषयी चर्चा सुरू आहे.

Advertisements
Advertisements

दुसरीकडे  राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी बोलताना पक्षाचे विधिमंडळातील नेते अजित पवार म्हणाले,”राष्ट्रवादी विरोधी पक्षातच राहणार, असे शरद पवार यांनी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे. जनतेनं तसा कौल दिलेला आहे. त्यामुळे या निर्णयात बदल होणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने विधिमंडळ पक्षनेता निवडलेला आहे. येत्या काळात योग्य ती जबाबदारी पार पाडू,” असं पवार यांनी सांगितलं.

आपलं सरकार