Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, ८१ जगासाठी ५ टप्प्यात मतदान

Spread the love

झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या ठिकाणी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. झारखंडमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी, ७ डिसेंबर रोजी दुसऱ्या, १२ डिसेंबर रोजी तिसऱ्या, १६ डिसेंबर रोजी चौथ्या आणि २० डिसेंबर रोजी पाचव्या टप्प्यात मतदान होणार असून २३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यात आल्याने राज्यात आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांनी आज जाहीर केलं.

येत्या ५ जानेवारी रोजी झारखंड विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या पाच उपायुक्तांनी १७-१८ ऑक्टोबर

झारखंड विधानसभेची संख्या ८१ असून राजकीय पक्षांना बहुमतासाठी ४१ चा आकडा पार करावा लागणार आहे. सध्या झारखंडमध्ये भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनची सत्ता आहे. मात्र यावेळी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपला ३७ जागा मिळाल्या होत्या तर एजेएसयूला ५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.रोजी झारखंडचा दौरा केला होता. झारखंडमध्ये एकूण १९ जिल्हे नक्षल प्रभावित असून त्यातील ६७ मतदारसंघ नक्षल प्रभावित आहेत.

दरम्यान झारखंडमध्ये पहिल्यांदाच दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना घरी बसून पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यांना घराशेजारी ईव्हीएमवर जाऊन मतदान करायचे नसेल तर पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याचा पर्याय त्यांना देण्यात आला आहे.

सध्या झारखंडमध्ये भाजप आणि ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनची सत्ता आहे. मात्र यावेळी त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी कसरत करावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१४च्या निवडणुकीत भाजपला ३७ जागा मिळाल्या होत्या तर एजेएसयूला ५ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपला बहुमताचा आकडा गाठण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे.

पहिला टप्पा । ३० नोव्हेंबर । जागा  १३ 

दुसरा टप्पा ।  ७ डिसेंबर । २० जागा

तिसरा टप्पा । १२ डिसेंबर। १७ जागा

चौथा टप्पा । १६ डिसेंबर। १५ जागा

पाचवा टप्पा । २० डिसेंबर ।  १६ जागा

पोलिंग बूथमध्ये २० टक्के वाढ ।   एकूण २.२६५ कोटी मतदार । राज्यात एकूण १९ जिल्ह्यांपैकी ६७ जिल्हे नक्षल प्रभावित आहेत.  हे १९ जिल्हे संवेदनशील असून १३ जिल्हे अति संवेदनशील आहेत

सध्याचं पक्षीय बलाबल : भाजप : ३७ । जेएमएम: १९ । काँग्रेस: ७ । जेव्हीएम: ८ । जेएसयू : ५ । इतर : ६ । एकूण: ८१

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!