Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics of maharashtra : चर्चेतली मोठी बातमी : सत्ता स्थापनेस उशीर , भाजपचा सेनेला राष्ट्रपती राजवटीचा इशारा

Spread the love

महाराष्ट्रातील सत्ता स्थापन करण्यासाठी महायुतीला जन्मताच स्पष्ट कौल मिळालेला असतानाही शिवसेना सत्तावाटपाच्या अर्ध्या-अर्ध्या फॉर्मुल्यावर अडून बसलेल्या शिवसेनेला भाजपनं अखेर निर्वाणीचा इशारा दिला आहे. येत्या ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असं भाजपने म्हटले  आहे.

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतानुसार राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असं म्हटलं आहे . विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी नव्या सरकारच्या स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. शिवसेनेनं अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची मागणी केली आहे. तर, भाजपने  मुख्यमंत्रीच काय, महत्त्वाची खातीही देण्यास नकार दिल्याने  सत्ता स्थापना रखडली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये या विषयावरून चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप वर्चस्ववादाचे  राजकारण करत असल्याने  शिवसेना देखील आक्रमक झाली आहे. कोणीही मुख्यमंत्रिपदाचा अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, असे वक्तव्य शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केल्यानं हा पेच आणखी  वाढला आहे.

दरम्यान वृत्त असे आहे कि , भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने  महाराष्ट्राच्या वाटाघाटीतून अंग काढून घेतले  असून राज्यातील नेत्यांनाच पेच सोडवण्याचा आदेश दिला आहे. मात्र, शिवसेना ऐकत नसल्याने अखेर भाजपने  राष्ट्रपती राजवटीचे  अखेरचे  अस्त्र बाहेर काढले  आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे  म्हटले  आहे. अर्थात, एक-दोन दिवसांत चर्चेला सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यास सत्ता पर्यायाने  भाजपच्याच हातात राहील असे भाजपाला वाटते त्या नंतर भाजपला त्यांचा अजेंडा राबवता येणार आहे. त्यासाठी जम्मू-काश्मीरचे उदाहरण देण्यात येत असून  मेहबुबा मुफ्ती यांच्याशी पटत नसल्याने  भाजपने मुफ्ती सरकार बरखास्त करून तिथे  राष्ट्रपती राजवट लागू केली होती. याची आठवण करून दिली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!