Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा , हि महाराष्ट्रातील जनतेची इच्छा, ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी सत्ता स्थापनेचे धाडस दाखवू नये : खा . संजय राऊत

Spread the love

महाराष्ट्राची जनता शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहू इच्छिते त्यामुळे ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते असे  शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले  आहे. भाजपाला आमच्यासोबत सरकार बनवायचे असेल तर मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटप झाले  पाहिजे अशीही मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली आहे. दरम्यान शरद पवार यांच्या भेटी मागचे राजकारण शोधू नका असेही  संजय राऊत यांनी म्हटले  आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तर तसे घडणार असेही राऊत यांनी स्पष्ट केलं.

शरद पवार हे देशाचे अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या अनुभवाचा फायदा होत असतो त्याचमुळे मी त्यांची भेट घेत असतो. माझ्यावर टीका होते तरीही मी भेट घेत असतो. शरद पवार यांच्या भेटीमागे राजकारण नाही. त्यांची भेट मी अधूनमधून घेत असतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सत्तेत समसमान वाटा हवा अन्यथा शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते आणि आपला मुख्यमंत्रीही बसवू शकते असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले . मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काँग्रेस नेते सोनिया गांधींच्या भेटीला गेले आहेत. ते शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी गेले आहेत त्याबाबत काय सांगाल? असं विचारलं असता आम्ही काँग्रेससोबत जाऊ असं वाटत नाही.  काँग्रेसचे नेते दिल्लीत का गेले? हे ठाऊक नाही हे तेच नेते सांगू शकतात असंही राऊत यांनी स्पष्ट केलं उद्धव ठाकरेंनी असे  काही आमदारांच्या बैठकीतही सांगितलेले  नाही. काही चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल असे  उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी जर तसे  म्हटलं आहे तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल यात शंका नाही असे ही राऊत म्हणाले . ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा नाही त्यांनी सत्तास्थापनेचे धाडस दाखवू नये असा इशाराही त्यांनी भाजपाला दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!