Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचं राजकारण : भाजप -सेनेत जुगलबंदी , १३ पेक्षा अधिक मंत्रीपदे देण्यासाठी शिवसेना पात्र आहे का ? : सुधीर मुनगंटीवार

Spread the love

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटून गेलेला असतानासुद्धा भाजप -सेनेची जुगलबंदी  चालूच असून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेवर आणखी एक शाब्दिक वार केला आहे . भाजपने शिवसेनेला १३ मंत्रिपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्यानंतर त्यावर  प्रश्न उपस्थित करताना भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कि , १३ पेक्षा अधिक मंत्रिपद देण्यासाठी शिवसेना पात्र आहे का,’  त्यांच्या या वक्तव्यामुळं युतीमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्रीपदावर बोलताना मुनगंटीवार म्हणाले कि , महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद शिवसैनिकालाच मिळणार आहे. त्याबाबत निश्चिंत राहावे. कारण देवेंद्र फडणवीस हे स्वत:ला शिवसैनिकच मानतात,’ दरम्यान शिवसेनेकडून खासदार संजय राऊत भाजपवर हल्ले प्रतिहल्ले करीत आहेत तर आता  भाजपकडून सुधीर मुनगंटीवार हे प्रसारमाध्यमांशी बोलत आहेत.

भाजपकडून  शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदासह १३ मंत्रिपदे देऊ केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. त्याविषयी वृत्तवाहिन्यांनी मुनगंटीवार यांना विचारले असता त्यांनी अप्रत्यक्षपणे त्यास दुजोरा दिला. ‘मुख्यमंत्रिपद सोडून इतर सर्व गोष्टींबाबत आम्हाला अजून चर्चा करायची आहे. शिवसेनेला काय प्रस्ताव द्यायचा हेही ठरायचं आहे. पण १३ पेक्षा अधिक मंत्रिपदं मिळण्यासाठी शिवसेना खरोखरच पात्र आहे का, असा  प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!