Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण आणि प्रसार माध्यमे : देवेंद्र फडणवीस म्हणे उद्धव ठाकरेंना स्वतः फोन करणार !!

Spread the love

महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा विषय भाजप -सेना , काँग्रेस -राष्ट्रवादी आणि माध्यमामधून इतकी चघळला  जात आहे कि , मुख्यमंत्री देवेंद्रा फडणवीस भाजप -शिवसेनेतील ताणले गेलेले संबंध जुळविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करणार असल्याची बातमीसुद्धा  चालविली जात आहे . यावरून प्रसार माध्यमे इतकी रिकामी झाली असल्याचे दिसत आहे .

काय बातम्या द्यावयाच्या आणि काय बातम्या देऊ नयेत याचेही भान माध्यमांना राहिलेले नाही . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच १३ मंत्रिपदे देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याचे वृत्त आल्यानंतर भारतीय जनता पक्ष लवकरच सरकार स्थापन करण्याबाबत शिवसेनेशी लवकरात लवकर चर्चा करणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हा गुंता सोडवण्यासाठी फडणवीस म्हणे स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करणार आहेत आणि भाजपच्या एका कॅबिनेट मंत्र्याने माध्यमांना हि माहिती दिली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील दोन पक्षांमधील संबंध जुळण्याकडे वाटचाल होत असल्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान आपल्या नेतृत्त्वात नवे सरकार येत्या दोन दिवसांमध्ये स्थापन होईल असे देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे. भाजप-शिवसेना युतीकडे स्पष्ट बहुमत असून काही अपक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे. युतीने २८८ पैकी १६१ जागा जिंकल्या आहेत. या जनादेशाचा मान राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असे फडणवीस म्हणाले. स्थिर सरकार स्थापन करण्यामध्ये काही अडथळे आहेत असे आम्हाला वाटत नाही. कळीच्या मुद्यांवर लवकरच एकमत होईल असा आपल्याला विश्वास असून लवकरच सरकार स्थापन केले जाईल असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

माध्यमांनी म्हटले आहे कि , देवेंद्र फडणवीस स्वत: उद्धव ठाकरे यांना फोन करून दोन्ही पक्षांदरम्यान निर्माण झालेला सत्तास्थापनेसंदर्भातील गुंता सोडवणार अशी माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका कॅबिनेट मंत्र्याने माहिती देताना सांगितले. शिवसेना आज (गुरूवार) आपल्या विधिमंडळ पक्षाचा नेता निवडणार असल्याचे वृत्त आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!