Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद : एम.आर.ग्रुपला घरघर लागली. गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले, पोलिसउपायुक्तांकडून चौकशी सुरु

Spread the love

औरंंंगाबाद : एक ते दोन वर्षांपासून एम.आर.ग्रुप विविध व्यवसायात गुंतवणूक करुन अल्पावधीत प्रकाश झोतात आले होते. शहरातील काही लोकांनी व्यवसायात गुंतवलेले पैशांवर नफा मिळत होता. लाखो रुपये एम.आर.ग्रुपमध्ये अडकवून याचा लाभ मिळत होता. या ग्रुपचे रोशनगेट, बुढीलेन येथे एम.आर.खलीया व कागजीपूरा रोडवर एम. आर. ढाब्याच्या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केले होते.
पण अचानकपणे दोन ते तीन दिवसापुर्वी रोशनगेट परिसरातील खलीया सेंटरचे बोर्ड गायब झाले. सध्या तेथे कुलूप लागले आहे. बुढीलेन खलीया सेंटर पण बंद झाले आहे. जूनाबाजार येथील मुख्य कार्यालय व ब्रँन्च कार्यालय देखील बंद असल्याने गुंतवणूक दारांचे धाबे दणाणले आहे.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी सांगितले की वरील प्रकरणात संमतीने व्यवहार झालेले आहेत.पूर्ण चौकशी झाल्यानंतरच गुन्हा दाखल होईल.

सोशलमिडीयावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. व्यवस्थापकांचे फोन स्विच ऑफ येत आहे अशी चर्चा सोशलमिडीयावर सुरु झाली आहे. एम.आर.खलीया का बंद आहे याचे कारण समोर येवू शकले नाही.
करोडो रुपये गुंतवणूकदारांनी या ग्रुपकडे व्यवसायात गुंतवलेले आहे अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. विविध अफवा शहरात सुरु झाली आहे सत्य काय आहे समोर आले नाही. गुंतवणूकदार कोण हे पण कळू शकले नाही. पण एम.आर.ग्रुपने विविध व्यवसायात पैसे गुंतवलेले आहे. मोठी जाहीरातबाजी करुन या ग्रुपने प्रसिद्धी मिळवली होती. या ग्रुपला घरघर लागल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!