Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : हडकोत मध्यवर्ती सहकारी बँक फोडण्याचा प्रयत्न

Spread the love

औरंंंगाबाद : हडको एन-१२ परिसरात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्याचा हा प्रताप बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडको एन-१२ परिसरातील स्वामी विवेकानंदनगर येथील सेंट्रल फॅसिलिटी  बिल्डींगमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. दिवाळी सणानिमित्त बँकेला २५ ते २९ ऑक्टोबर या काळात सुट्या होत्या. बँक बंद असल्याची संधी साधुन चोरट्याने सेंट्रल फॅसिलिटी बिल्डींगच्या स्वच्छतागृहाच्या खिडकीतून इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर बँकेचे चॅनल गेटचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला. चोरट्याने मुख्य तिजोरी समोरील दरवाज्याचा कडी कोंडा तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु मुख्य तिजोरीचा कडी-कोंडा न तुटल्यामुळे चोरट्यांचा डाव फसला.

दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी बँकेच्या कर्मचारी सरला अशोक जैस्वाल (वय ५५, रा.पवननगर) यांना बँकेचे कुलूप चोरट्याने तोडले असल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती जैस्वाल यांनी तात्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली असता बँकेतील सर्व ऐवज सुरक्षीत असल्याचे दिसून आले. याप्रकरणी सरला जैस्वाल यांच्या तक्रारीवरून चोरट्याविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जमादार पवार करीत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!