Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pakistan : कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला भीषण आग , ६५ ठार ३० हुन अधिक जखमी

Spread the love

पाकिस्तानमध्ये  कराची-रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला आज  सकाळी लागलेल्या भीषण आगीत ६५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. तर ३० हून अधिक प्रवासी गंभीररित्या भाजले आहेत. स्फोट झाल्याने एक्स्प्रेसला आग लागल्याचे वृत्त आहे. या आगीत एक्स्प्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशिद यांनी सांगितलं की, सिलिंडर स्फोटामुळं एक्स्प्रेसमध्ये आग लागली. प्रवाशांची सकाळी नाश्त्याची वेळ होती. त्याचवेळी अचानक स्फोट झाला. एक्स्प्रेसच्या सुरुवातीच्या तीन डब्यांमध्ये आग पसरली. काही प्रवाशांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. ही एक्स्प्रेस कराचीहून रावळपिंडीकडे जात होती.

या विषयी अधिक माहिती अशी कि , पंजाब प्रांताच्या दक्षिणेकडील रहीम यार खान या ठिकाणी कराची – रावळपिंडी तेजगाम एक्स्प्रेसला  आज भीषण आग लागली. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटानंतर एक्स्प्रेसचे तीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले . या दुर्घटनेत आतापर्यंत ६५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना मुल्तानच्या बीवीएच बहावलपूर आणि पाकिस्तान-इटालियन मॉडर्न बर्न सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रहीम यार खानचे उपायुक्त जमील अहमद यांच्या देखरेखीखाली बचावकार्य सुरू आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी स्फोटानंतर पहिल्या इकॉनॉमी क्लासचे दोन डब्यांमध्ये आग लागली. तर एका बिझनेस क्लासच्या डब्यालाही आग लागली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचाव पथक दाखल झालं आहे. काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी धावत्या एक्स्प्रेसमधून उड्या मारल्याची माहिती मिळते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!