Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वाहन बाजार : मर्सिडीझ-बेन्झ इंडियाच्या १३००० कार्सची विक्री

Spread the love

भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक मर्सिडीझ-बेन्झच्या जीएलई मॉडेलच्या सर्व कारची विक्री झाली आहे. संपूर्ण देशभरातून मर्सिडीझ-बेन्झला चांगली मागणी येत असल्याचे वृत्त आहे. या वृत्तानुसार  आधीच आखणी करण्यात आलेल्या योजनेच्या तीन महिने आधीच सर्व जीएलई कारची विक्री झाल्याची घोषणा मर्सिडीझ-बेन्झ इंडियाने केली आहे. आता, २०२० मधील ऑटो-एक्स्पोच्या आधी भारतीय बाजारपेठेत येणार असलेल्या नवीन जीएलईच्या कारच्या बुकिंगना सुरुवात झाली आहे.

मर्सिडीझ-बेन्झच्या सर्वात प्रमुख गाड्यांमध्ये जीएलईचा समावेश झाला असून भारतात जवळपास १३००० गाड्या विकल्या गेल्या आहेत. नवीन जीएलई गाडी त्यातील अतुलनीय वैशिष्ट्ये आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लक्झरी एसयूव्ही विभागात एक नवा, आधुनिक मापदंड ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे .

या वृत्तानुसार सणासुदीच्या काळात ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळविण्याचा मान मर्सिडीझ-बेंझ इंडियाने कायम राखला आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर फक्त दिल्ली एनसीआरमध्ये २५० पेक्षा जास्त कार ग्राहकांकडे सुपूर्द करण्यात आल्या. त्याचप्रमाणे संपूर्ण देशभरात सणांच्या दिवसात ६०० पेक्षा जास्त कारचा ताबा ग्राहकांना देण्यात आल्याची माहिती मर्सिडिजकडून देण्यात आली. ग्राहकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जीएलईच्या नवीन गाडीच्या शुभारंभाच्या तीन महिने आधीच सध्याच्या सगळ्या जीएलई कार विकल्या गेल्या असून मर्सिडीझ-बेन्झच्या नवीन जीएलईच्या बुकिंग्सही बुधवारपासून सुरू झाल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली. सणाच्या काळात संपूर्ण देशभरातून मर्सिडीझ-बेन्झ कारची अभूतपूर्व मागणी असल्याचे चित्र होते. दिल्ली एनसीआरसह, पंजाब, पश्चिम मुंबई, पुणे आणि गुजरातमधून कारची मागणीचा अधिक होती. मर्सिडीझ-बेन्झ इंडियाच्या ‘बेस्ट सेलर्स’ कारमध्ये जीएलईचा समावेश आहे. शुभारंभापासून आतापर्यंत जवळपास तब्बल १३००० कारची विक्री करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!