Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Jammu and Kashmir : युरोपियन युनियनच्या खासदारांने दिले खा . असदुद्दीन ओवेसी यांच्या टीकेला हे उत्तर

Spread the love


जम्मू काश्मीरमध्ये युरोपियन युनियनच्या खासदारांना जाण्याची परवानगी दिल्याचे प्रकरण देशात गाजत असून सरकारच्या या निर्णयावरून विरोधी पक्षाकडून  टीका करण्याची मोठी स्पर्धा लागली आहे. मंगळवारी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला करताना सरकार नाझी समर्थकांना काश्मीरमध्ये पाठवत असल्याचे म्हणाले होते. यावर केंद्र सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण युरोपियन खासदाराने मात्र यावर उत्तर दिले आहे.


एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या टीकेचे उत्तर देताना युरोपियन युनियनचे प्रतिनिधी फ्रान्सचे नेते आणि खासदार थियरी मरिआनी म्हणाले कि ,  माध्यमांमध्ये प्रतिक्रिया पाहिली, ज्यात आम्हाला नाझी समर्थक सांगण्यात आलं, हे पाहून मला आश्चर्य वाटलं. कुणीही बोलण्यापूर्वी आमच्याबाबत माहिती काढणं आवश्यक आहे, असा सल्लाही मरिआनी यांनी दिला. ते पुढे म्हणाले कि , मी मंत्री म्हणून काम केलं असून विविध १४ पदांवर निवडून आलो आहे. ६१ वर्षीय मरिआनी फ्रान्सच्या द रिपब्लिकन्स पक्षाचे सदस्य आहेत. त्यांनी परिवहन मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे.

माझी राजकीय कारकीर्द ४० वर्षांपूर्वी सुरु झाली, नाझी समर्थक असतो, तर निवडून आलो नसतो, असेही  ते म्हणाले. काश्मीरच्या लोकांशी आम्ही बातचीत केली, ज्यात त्यांनी आम्हीही इतर देशवासियांप्रमाणेच भारतीय असल्याचं सांगितलं.

या दौऱ्याच्या आयोजक मादी शर्मा आहे, त्या  मादी ग्रुपच्या प्रमुख आहेत.त्यांनीच  युरोपियन युनियनच्या खासदारांना निमंत्रण पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट आणि काश्मीर भेटीचं आश्वासन दिलं होतं. मादी ग्रुप हे आंतरराष्ट्रीय खाजगी क्षेत्र आणि एनजीओचं मोठं जाळं असल्याचंही सांगितलं जात आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने म्हटले आहे कि , त्यांना  मिळालेल्या ई-मेलच्या कॉपीनुसार, ७ ऑक्टोबर २०१९ रोजी मादी शर्मा यांनी युरोपियन खासदारांना ई-मेल केला. २८ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत व्हीआयपी बैठक आणि २९ ऑक्टोबरला काश्मीर दौऱ्याचं आश्वासन या ई-मेलमधून दिलं. यानंतर पत्रकार परिषदेबाबतही उल्लेख होता. भारतीय मीडियामध्ये हे वृत्त समोर आल्यानंतर मादी शर्मा या नेमक्या आहेत तरी कोण याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!