Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : दिवाळी शुभेच्छा देणार्‍या मित्राचा दारुच्या नशेत किरकोळ वादातून खून, पाच अटकेत

Spread the love

औरंगाबाद – गारखेड्यातील न्यायनगरात रविवारी मध्यरात्री दिवाळीच्या शुभेच्छा देणार्‍या मित्राला रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारांनी दारुच्या नशेत सू-याचे  वार करुन ठार केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून  पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी तीन आरोपीं रेकाॅर्डवरचे  गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले कि ,  निलैश उर्फ सुर्‍या रांजणे (२३) मजूर, रा.न्यायनगर, रोहित दिलीप नरवडे (२१) रा.हुसेन काॅलनी, पवन दिवैकर(२१) रा. न्यायनगर, साई आनंदा येळणे (२१) विक्की वाहूळ अशी अटक आरोपींची नावे आहेत. यांनी त्यांचा मित्र सचिन विष्णू वाघ(२५) याच्यावर आणि सुरी ने वार करुन खून केला.

या पैकी सुरेश रांजणे आणि साईनाथ येळणे यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच रोहित नरवडे, पवन देवकर यांच्या  सहित रांजणे आणि येळणे यांना जालन्याजवळ सोमवारी दुपारी ४ वा.ताब्यात घेतले तर विकी वाहूळ याला कन्नडहून ताब्यात घेण्यात आले.

सचिन वाघ याने वरील आरोपी मित्रांसोबत गजानन महाराज मंदीरा जवळील सुपरवाईन शाॅपी मधून रविवारी दुपारी  दारु खरेदी केली व नर्सरी शाळेजवळ जाऊन मद्य प्राशन केले. त्यावेळेस त्यांची नशेमधे बाचाबाची झाली होती. त्यानंतर सचिनला वरील आरोपींनी रात्री घराबाहेर आवाज देऊन बोलावले  परंतु  सचिन हा रविवारी रात्री लवकर घरी न परतल्याने त्याचा लहान भाऊ अजयची  वाट पाहतो असे आईला सांगून निघून गेला त्यावेळेस वरील सर्व आरोपी घटनास्थळी  दिसले त्यांना पाहताच अजय ने वरील आरोपींना हॅप्पी दिवाळी असे म्हणताच निलेश रांजणेने शिवी दिली. त्यामुळे  चिडलेल्या सचिन वाघने निलेशला बेल्टने मारले. यामुळे निलेशने सुरी काढून सचिनवर वार केले. यात सचिन गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता. सोमवारी सकाळी ११वा. सचिनला डाॅक्टरांनी मृत  घोषित केले. किरकोळ वादानंतर वरील प्रकरण घडल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी अजय आणि आई सुमन वाघ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींच्या ताब्यातून खुनामधे वापरलेले शस्र जप्त केले आहेत. पुढील तपास पोलिस उपायुक्त डाॅ राहूल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घन्नशाम सोनवणे करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!