Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाकिस्तान : माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची प्रकृती चिंताजनक , रुग्णालयाबाहेर चाहत्यांची गर्दी

Spread the love

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पाकिस्तानातील लष्कराच्या रुग्णलयात दाखल करण्यात आले असून त्यांची यांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्या रक्तातील पेशी ४५ हजारावरून २५ हजारावर आल्या आहेत. त्यांना श्वसनासही त्रास होत असल्याने  शरीफ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं वृत्त पसरल्याने त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी केली आहे.

इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शनिवारी अल अजीजिया भ्रष्टाचार प्रकरणातून नवाज शरीफ यांना मंगळवारपर्यंत जामीन दिला होता. याप्रकरणी शरीफ सात वर्षापासून शिक्षा भोगत आहेत. याआधी शुक्रवारी धनादेशाच्या एका प्रकरणात लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता. वैद्यकीय कारणाच्या आधारावर दोन्ही न्यायालयाने त्यांना जामीन दिला होता.

पाकिस्तानातील लष्करी रुग्णालयाचे सीएओ डॉ. मोहम्मद अयाज यांनी दिलेल्या माहितीनुसार शरीफ यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी शरीफ यांच्या रक्तातील पेशी ४५ हजारावरून २५ हजारावर आल्या. त्यांच्या प्रकृतीत किंचितशी  सुधारणा झाली असली तरी त्यांची प्रकृती अद्यापही गंभीर आहे. गेल्या सोमवारीच भ्रष्टाचार विरोधी पथकाने शरीफ यांना तातडीने लष्करी रुग्णालयात दाखल केले होते. शरीफ यांनी छातीत दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारावेळी त्यांच्या रक्तातील पेशीही कमी होत असल्याचं आढळून आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

दरम्यान, शरीफ यांची प्रकृती ढासळल्याचं कळल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलच्या बाहेर मोठी गर्दी केली आहे. शरीफ यांना लवकर बरे वाटावे म्हणून त्यांच्या समर्थकांकडून नमाज अदा केली जात आहे. शरीफ यांच्यावर लाहोर तुरुंगात विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. डॉन वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, नवाझ शरीफ यांच्याविरोधात कट शिजत असल्याचा आरोप लंडनमध्ये राहणाऱ्या हुसैन नवाझ यांनी केला होता. ही विषाची लक्षणे आहेत. नवाझ शरीफ यांना काही झालं तर त्याची जबाबदारी कुणाची आहे हे तुम्हाला ठाऊक आहे, असं ट्विट हुसैन नवाझ यांनी केलं होतं. नवाझ शरीफ यांचं वैद्यकीय अहवाल मंगळवारी आला. त्यानुसार, शरीफ यांच्या शरीरातील पेशींची संख्या १६ हजारांहून कमी झाल्या असून दोन हजारांपर्यंत आल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळं त्यांची प्रकृती बिघडली असल्याचे आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!