Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर , पाकिस्तानने त्यांच्या हवाई हद्दीतून प्रवेश नाकारला

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाण्यासाठी त्यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास पाकिस्तानने पुन्हा नकार दिला आहे. यापूर्वीही पाकिस्तानने मोदींना अमेरिकेला जाण्यासाठी हवाई प्रवेश नाकारला होता. पाकिस्तानी मीडियाने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांच्या वक्तव्याचा हवाला देत ही माहिती दिली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी मोदींच्या कार्यालयाने आमच्याकडे हवाई हद्दीतून प्रवेश देण्याची परवानगी मागितली होती. आम्ही ही परवानगी नाकारली आहे, असे शाह महमूद कुरैशी यांनी सांगितले .

आज  २८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने पाकिस्तानकडे त्यांच्या हवाई हद्दीतून प्रवेश देण्याची परवानगी मागितली होती. २९ ऑक्टोबर रोजी सौदी अरेबियात एक संमेलन पार पडणार आहे. त्यात मोदी भाग घेणार असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही या संमेलनात भाग घेण्यासाठी २८ ऑक्टोबर रोजी सौदीला रवाना होणार आहेत.

काळा दिवस आणि जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने होत असलेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनामुळेच मोदींच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार देण्यात आल्याचं कुरैशी यांनी सांगितलं. भारतात एकीकडे दिवाळीचा उत्सव धडाक्यात सुरू असताना दुसरीकडे पाकिस्तानात  काळा दिवस साजरा करण्यात आला. २७ ऑक्टोबर १९४७ रोजीच भारतीय सैन्याने जम्मू-काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावलं होतं. त्यामुळे २७ ऑक्टोबर हा पाकिस्तानात काळा दिवस म्हणून पाळला जातो.

दरम्यान, यापूर्वी मोदी २१ सप्टेंबर रोजी अमेरिकेला जाणार होते. २७ सप्टेंबरपर्यंत त्यांचा हा दौरा होता. त्यावेळीही पाकिस्तानने त्यांच्या विमानाला हवाई हद्दीतून प्रवेश देण्यास नकार दिला होता. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं विमान पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाऊ देण्यास पाकिस्तानने  नकार दिला होता. राष्ट्रपती कोविंद ९ सप्टेंबर रोजी स्वित्झर्लंड आणि स्लोवेनियाच्या दौऱ्यावर जात जाणार होते. या दौऱ्यासाठी त्यांना पाकिस्तानमधून जावे लागणार होते. त्यावेळी पाकने त्यांना प्रवेश नाकारला होता. विशेष म्हणजे त्याच्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी ते पाकिस्तान मार्गेच गेले होते. त्यावेळी पाकिस्तानने कोणताही विरोध दर्शवला नव्हता मात्र आता पाकिस्तानने विरोध केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!