Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

स्विगीचा डिलेव्हरी बॉय मुस्लिम आहे म्हणून पार्सल घेणे टाळले , ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल

Spread the love

झोमॅटोचा डिलेव्हरी बॉय मुस्लिम आहे म्हणून त्याच्या हाताचे फूड पार्सल घेण्यास नकार दिल्याचे  गाजलेले प्रकरण ताजे असतानाच आता स्विगी चे फूड पार्सल देणारा मुलगा मुस्लिम आहे म्हणून त्याने आणलेले पार्सल घेण्यास नकार दिल्याची घटना हैदराबाद येथे घडली आहे . याप्रकरणी या ग्राहकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय कुमार असे या ग्राहकाचे नाव असून त्याने स्विगीवरुन जेवण मागवलं होतं. परंतु  जेवणाची डिलिव्हरी घेऊन आलेला माणूस मुस्लिम होता म्हणून त्याने हे जेवण स्वीकारण्यास नकार दिला.

स्विगीकडे त्याने तुम्ही हिंदू डिलिव्हरी बॉय पाठवा अशी मागणी त्याने केली होती. दरवाजात अन्न घेऊन आलेल्या माणसाला तो मुस्लिम आहे म्हणून अजय कुमार या ग्राहकाने परत पाठवले होते. आता याच प्रकरणी पोलिसांनी अजय कुमारविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुदासिर नावाच्या डिलिव्हरी बॉयने त्याला अन्न आणून दिले मात्र मी मुस्लिम माणसाच्या हातून अन्न घेणार नाही असे म्हणत अजय कुमारने ही ऑर्डर नाकारली. याप्रकरणी अजयकुमार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असच प्रकार श्रावण महिन्यात दिल्लीत घडला होता तेंव्हा हे  प्रकरण देशभर गाजले होते आणि त्यावर अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या होत्या मात्र ” अन्नाला कुठलाही धर्म नसतो ” असे ट्विट करून झोमॅटो आपल्या डिलेव्हरी बॉयच्या मागे ठामपणे उभे राहिले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!