Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भाजपच्याच नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार काम करेल , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट संकेत

Spread the love

शिवसेनेत चालू असलेल्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी , महायुतीत भाजपला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने कौल दिला असून पुढील पाच वर्षे भाजपच्या नेतृत्वाखालीच राज्यात महायुतीचं सरकार काम करेल, असे  ठाम प्रतिपादन केले आहे तर शिवसेना-भाजपमध्ये सत्तावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात बोलताना देवेंद्र फडणवीस हेच आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, असे सांगितले असून  मुख्यमंत्री बदलण्याचा प्रश्नच नाही. फडणवीस यांचं काम चांगलं आहे, असेही पाटील स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्रात पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होणार की शिवसेनेचा होणार, याची चर्चा झाडात असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेले  विधान  महत्त्वाचे  मानले  जात आहे. राज्यात आम्ही पुन्हा एकदा स्थिर सरकार देणार असून युतीचे हे सरकार ५ वर्षे भाजपच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे, असे सांगून फडणवीस यांनी ५ वर्षे मुख्यमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

मुंबईत भाजपने आयोजित केलेल्या दिवाळी संमेलनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाची बाजू स्पष्ट केली. दिवाळीनंतर सत्तास्थापनेसाठी आवश्यक पावले उचलली जातील, असेही यावेळी फडणवीस यांनी स्पष्ट केले. जनतेने भाजप, शिवसेना, रिपाइं, रासप, शिवसंग्राम महायुतीला सत्तेसाठी स्पष्ट कौल दिला आहे. त्याचा सन्मान आम्ही सर्वांनी राखला पाहिजे. याबाबत कोणाच्याच मनात शंका नाही, असेही फडणवीस म्हणाले. दिवाळीनंतर भाजप आपल्या विधीमंडळ पक्षनेत्याची निवड करेल. त्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा होईल, असेही फडणवीस यांनी पुढे नमूद केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!