Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभेत महिलांचा टक्का किती ?

Spread the love

नव्या विधानसभेत २३ महिला आमदार असतील असे चित्र असून त्यात ११ विद्यमान आमदारांचा समावेश आहे. मावळत्या विधानसभेत २२ महिला आमदार होत्या. त्यात यावेळी एका आमदाराची भर पडताना दिसत आहे. राज्यातील सर्व २८८ जागांचा विचार केल्यास यावेळी निवडणुकीच्या रिंगणात एकूण ३ हजार २३७ उमेदवार उतरले होते. त्यात २३५ महिला उमेदवारांना विविध राजकीय पक्षांनी संधी दिली होती.

यंदाच्या निवडणुकीत ज्या विद्यमान आमदार पुन्हा विजयी झाल्या आहेत त्यात मंदा म्हात्रे (बेलापूर) मनीषा चौधरी (दहिसर) विद्या ठाकूर (गोरेगाव), देवयानी फरांदे (नाशिक मध्य), सीमा हिरे (नाशिक पश्चिम), माधुरी मिसाळ (पर्वती) मोनिका राजळे (शेवगाव), भारती लव्हेकर (वर्सोवा) यांचा समावेश आहे. या आठही भाजपच्या आमदार आहेत. काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे (सोलापूर शहर मध्य) यशोमती ठाकूर (तिवसा) आणि वर्षा गायकवाड (धारावी-मानखुर्द) यांनी पुन्हा एकदा आपापल्या मतदारसंघातून दिमाखात विजय मिळवला आहे.

पहिल्यांदाच विधानसभेत निवडून जाणाऱ्या महिला आमदारांमध्ये राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे (देवळाली), शिवसेनेच्या लता सोनावणे (चोपडा) आणि यामिनी जाधव (भायखळा), भाजपच्या मुक्ता टिळक (कसबा पेठ), श्वेता महाले (चिखली), मेघना बोर्डीकर (जिंतूर), नमिता मुंदडा (केज), काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर (वरोरा) व सुलभा खोडके (अमरावती) यांचा समावेश आहे. गीता जैन (मिरा भाईंदर) आणि मंजुळा गावित (साक्री) या दोन अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजयी झाल्या आहेत.

दरम्यान यंदाच्या निकालातील ठळक बाब म्हणजे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व फायरब्रँड महिला नेत्या पंकजा यावेळी सभागृहात असणार नाहीत. परळी विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकजा यांचा यावेळी धक्कादायकरित्या पराभव झाला. भाऊ विरुद्ध बहिण यांच्यातील ही कडवी झुंज यावेळी भाऊ धनंजय मुंडे यांनी जिंकली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!