Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अभिजित बिचकुले आणि त्याची पत्नी अलंकृता बिचकुलेंच्या मतांचीही चर्चा ….

Spread the love

निवडणूक लोकसभेची असो कि विधानसभेची काही उमेदवार निव्वळ चर्चेसाठी उभे राहतात आता ते हे मुद्दाम करतात कि नकालपणे हा एक संशोधनाचा विषय आहे . पण त्यांच्या मुलाखती ऐकल्यानंतर ते खरोखरच गंभीर असतात हे शोषत होते हे मात्र नक्की . यावर्षीच्या चर्चेतल्या उमेदवाराचे नाव आहे अभिजित बिचकुले . कोण हा बिचकुले ? तर हा बिचकुले म्हणजे मराठी बिग बॉस मुळे  झोतात आलेला.

हाच बिचकुले वरळी आणि सातारा मतदारसंघातून विधानसभेसाठी उभा होता. त्याने प्रचारही केला. यापैकी सातारा विधानसभा मतदार संघात त्याला ७५९ मते मिळाली यात त्याला ५ पोस्टल मते मिळाली. तर वरळी विधानसभा मतदार संघात त्याला ७८१ मते मिळाली येथेही त्याला मिळालेल्या पोस्टल मतांची संख्या ५ आहे . त्याचबरोबर त्याची पत्नी अलंकृता बिचकुले यांनी सातारा लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढविली येथे त्यांना १६४५ मते मिळाली विशेष म्हणजे त्यांना  मिळालेल्या पोस्टल मतांची संख्या १३ आहे.

मुंबईतील वरळी मतदारसंघाच्या निकालावर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्यानं ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्याचवेळी बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांनी थेट आदित्य यांना आव्हान दिल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. वरळीत पहिल्या फेरी अखेर शून्यावर असलेल्या बिचुकलेंनी मतमोजणीत ७८१ मत मिळवली होती. तर, साताऱ्यात भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे यांच्याविरोधात बिचुकलेंना अवघी ७५९ मतं मिळाली .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!