Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नेता निवडीच्या सर्वच पक्षांच्या बैठक दिवाळीनंतर , राष्ट्र्वादीने जाहीर केली सरकार स्थापनेबाबतची आपली भूमिका

Spread the love

भारतीय जनता पक्ष आणि शिवेसनेला सत्तास्थापनेचा जनादेश मिळाला असून सत्तास्थापनेत आमची कोणतीही भूमिका नसेल, आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणूनच काम करू, असे ठाम मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मांडले आहे. शरद पवार यांनी हे मत मांडण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही हीच भूमिका मांडली आहे. २०१४ चे निकाल लागत असतानाच भाजपाला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या वक्तव्याने अजूनही चर्चेत  आलेले राष्ट्रवादीचे नेते प्रफ्फुल्ल पटेल यांना त्यांचे वक्तव्य दुरुस्त करण्याची संधी पक्षाने दिल्यामुळे यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवारांनीच भूमिका पत्रकारांना सांगितली.

बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आम्ही सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्प्ट केले आहे. दिवाळी संपताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग येणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिवाळी आल्याने  सर्वच राजकीय चार दिवस थांबावे लागले आहे. यामुळे दिवाळीनंतर पुढच्या आठवड्यात भाजपने विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावलीय. ३० तारखेला बुधवारी ही बैठक मुंबईत होणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही याच दिवशी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक ३० तारखेला होणार आहे. या बैठकीत पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड करण्यात येणार आहेय. दुपारी १ वाजता विधिमंडळ भाजप कार्यालयात ही बैठक होणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. भाजपचे नवनिर्वाचित सर्व १०५ आमदार या बैठकीला उपस्थित असतील.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ५४ जागा जिंकल्या आहेत. यामुळे राष्ट्रवादी सर्वांत मोठा विरोधी पक्ष ठरला आहे. यामुळे पक्षाच्या विधिमंडळ नेत्याची निवड ३० तारखेला होण्याची शक्यता आहे. तसंच विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने काँग्रेसपेक्षा अधिक जागा जिंकल्या आहेत. यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर राष्ट्रवादीकडून दावा करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!