Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : सहप्रवाशी महिलेने केले दीड लाखांचे दागिने लंपास , गुन्हा दाखल

Spread the love

औरंगाबाद – सोनईहून नांदेड ला जाणार्‍या विवाहातेचे बॅग मधील एक ते दीड लाखांचे दागिने महिला सहप्रवाशाने चोरल्याचा गुन्हा क्रांती चौक पोलिस ठाण्यात आज(मंगळवारी) दाखल झाला.

अधिक माहिती अशी कि , रवि गंगाधर गादेवार(३२) रा. सोनई हे नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद येथे नौकरी निमित्त राहतात. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घोडेगावहून पुणे औरंगाबाद बसने गादेवर त्यांची पत्नी अंजली व मुलगा श्रेयस(३.५)वर्षै यांच्या सोबत प्रवास करंत होते.. अंजली ही चालकाशेजारील सीटवर बसली होती. व त्यांच्या शेजारी एक महिलाही बसली होती. सकाळी ११ वा. बाबा पेट्रोलपंप चौकात गादेवार बसमधून उतरत असतांना अंजली यांच्या कानातील झूमका खाली पडलेला गादेवार यांच्या लक्षात आला. तेंव्हा अंजली यांच्या शेजारी बसलेली सहप्रवाशी महिला गडबडीने उतरुन पसार झाली. दरम्यान अंजली यांना संशय आल्यामुळे त्यांनी बॅगमधील दागिन्याचा डबा तपासला असता तो रिकामा दिसला.

गादेवार यांनी त्वरीत क्रांती चौक पोलिस ठाणे गाठून दागिने गहाळ झाल्याची तक्रार देत.महिला सहप्रवाशाबाबत संशय व्यक्त केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर एपीआय राहूल सूर्यतळ यांनी बाबा पेट्रोल पंप तेरेल्वेस्टेशन परिसर पिंजून काढला पण ती सहप्रवाशी महिला सापडली नाही. या प्रकरणी पुढील तपास पीएसआय संदीप शिंदे करत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!