Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : खासदार पत्नीच्या फेसबुक पोस्टमुळे खळबळ

Spread the love

केरळमधील खासदाराच्या पत्नीने ‘नशिब हे बलात्कारसारखं असतं. तुम्ही त्याला रोखू शकत नाहीत. त्यामुळे आनंद  घ्यायचा प्रयत्न करा’, अशी फेसबुक पोस्ट केल्यामुळे हि पोस्ट चांगलीच व्हायरल झाली त्यामुळे अनेक फेसबुक्यांनी त्यांना चांगलेच ट्रॉल केले.  हि पोस्ट करणाऱ्या अन्ना ईडन या केरळचे काँग्रेस खासदार हिबी ईडन यांच्या पत्नी आहेत . त्यांच्या या वक्तव्यावरुन नेटीझन्सनी त्यांना प्रचंड ट्रोल केलं आहे. बलात्कार सारख्या संवेदनशील विषयावर अशाप्रकारे बोलणं योग्य नसल्याचं सर्वसामान्यांकडून बोललं जात आहे. त्याचबरोबर खासदार सारख्या पदावर असणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीन सोशल मीडियावर अशाप्रकारचं मत  व्यक्त करणं चिंतेची बाब असल्याचे देखील काही फेसबुक युजर्सनं म्हटलं आहे. या पोस्टमुळं मोठा वाद निर्माण झाल्यानंतर अॅन्नानं ही पोस्ट फेसबुकवरून हटवली आणि माफीही मागितली.

यापूर्वीही  २०१३मध्ये सीबीआयचे तत्कालीन संचालक रंजित सिन्हा यांनीही अशाच प्रकारे वादग्रस्त विधान केलं होतं. बलात्कार रोखू शकत नसाल तर, त्याचा आंनद घेता का? असं विधान त्यांनी केलं होतं. सट्टेबाजीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांची जीभ घसरली होती. या विधानावरून वाद निर्माण झाल्यानं त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.


दरम्यान, लोकांकडून होणाऱ्या टीकेमुळे अन्ना ईडन यांनी अखेर आपल्या फेसबुकवर वॉलवरुन ती पोस्ट डिलीट केली आहे. मात्र, तरीही या पोस्टचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


अन्ना ईडन यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोन व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यातील एक व्हिडिओ हा सिज्लरचा आनंद लुटण्या संदर्भात तर दुसरा व्हिडिओ त्यांच्या मुलासंदर्भात होता. या दोन्ही व्हिडिओंना त्यांनी ‘नशिब हे बलात्कारसारखं असतं. तुम्ही त्याला रोखू शकत नाहीत. त्यामुळे मज्जा घ्यायचा प्रयत्न करा’, असं कॅप्शन दिलं होतं. त्यांच्या याच पोस्टवरुन फेसबुक युजर्सनी त्यांच्यावर टीका केली.

अन्ना ईडन या केरळचे काँग्रेस खासदार हिबी ईडन यांच्या पत्नी आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढवली होती. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत हिबी ईडन यांचा एर्नाकुलम मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांचा विजय झाला होता.

अॅन्ना इडननं मंगळवारी सकाळी फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली होती . या पोस्टमध्ये तिचे पती आणि काँग्रेस खासदार हिबी इडन यांचा फोटोही शेअर केला होता. सोशल मीडियावर ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आणि अॅन्नासह खासदार हिबी यांच्यावरही टीकेची झोड उठली. या वादानंतर अॅन्ना यांनी माफी मागितली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!