Good News : केंद्रीय कर्मचाऱयांच्या वेतनात नोव्हेंबरमध्ये होऊ शकते इतकी वाढ !!

Spread the love

येत्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे .  कारण मोदी सरकारकडून दिवाळीनंतर नोव्हेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनात वाढ करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारच्या सातव्या वेतनाच्या आयोगाच्या शिफारसीनुसार कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार  सध्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे किमान वेतन ८ हजार ते १८ हजार रुपयांनी वाढू शकते. सरकारच्या आदेशानंतर केंद्रीय शासकीय कर्मचाऱ्यांना २६ हजार प्रति महिना किमान वेतन मिळू शकते.

गेल्या काही काळापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडे बेसिक सॅलरीमध्ये वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. तर मीडिया रिपोर्ट्समध्ये यापूर्वी ही कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र सत्यात असे काही अद्याप झालेले नाहीच. परंतु आताच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आाल आहे की, यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार गंभीर विचार करुन निर्णय घेणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यापर्यंत सर्व काही ठिक झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा विचार केला जाणार आहे.

सध्या शासकीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतन १८ हजार रुपये प्रति महिना देण्यात येते. जे फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के आहे. मात्र कर्मचारी बेसिक फिटमेंट फॅक्टर मध्ये ३.६८ टक्क्यांनी वाढवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे जर सरकारने कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये ३.६८ टक्क्यांनी वाढ केल्यास त्यांनी बेसिक सॅलरी २६ हजार रुपये प्रति महिना होणार आहे. पण या निर्णयामुले सरकारवर अतिरिक्त भार पडणार आहे.

आपलं सरकार