Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Bad News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, मतदानासाठी निघालेल्या  ३ मुंबईकरांचा मृत्यू

Spread the love

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून पुण्याच्या दिशेनं जाणारी खासगी बस उटलून भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. यातील सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. कामशेत बोगद्याजवळ हा अपघात घडला आहे.

कामशेत बोगदापासून काही अंतरावर सोमवारी  पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसनं सर्व्हिस लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. अपघातावेळी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होती. यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सयाजी पाटील, संभाजी पाटील आणि मोहन नलावडे अशी मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व प्रवासी मुंबई घनसोली येथून पाटस सातारा येथे मतदान करण्यासाठी जात होते.

ही खासगी बस कामशेत बऊर गावाजवळ पोहोचल्यानंतर चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसची मागून जोरदार धडक बसली. यामुळे हा अपघात झाला.  अपघातानंतर महामार्ग तसेच स्थानिक पोलिसांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तळेगाव येथील पावना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!