Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महत्वाची सूचना आपल्या सर्वांसाठी : मनाने औषध घेताय ? मग हे पहाच , आणि इतरांनाही शेअर करा !!

Spread the love

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने जनहितार्थ सूचना जरी केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे कि , औषधांच्या पाकिटावर तुम्हाला लाल रेष किंवा निशाण निदर्शनास आल्यास संबंधित औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याविना घेऊ नये. बऱ्याचदा अंग दुखीचा किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर बहुतांश लोक डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन  स्वतःच औषधी खरेदी करून त्याचे सेवन करतात. पण डॉक्टरांच्या सल्ल्याविनाच घेतलेल्या औषधांचा तुमच्या शरीरावर प्रचंड विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही . कित्येकदा तर नवीन आजारांनाही आमंत्रण मिळतं. किंवा अशा औषधांपासून होणारे साईड इफेक्ट लक्षात येत नाहीत. त्यामुळे जनतेचे शारीरिक नुकसान टाळण्यासाठी नागरिकांमध्ये औषधांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरकारकडून हि महत्त्वपूर्ण माहिती दिली जात आहे.

औषधांच्या पाकिटावरील लाल निशाणाचा अर्थ समजून घ्या…

ज्या औषधांच्या पाकिटावर लाल रंगाचं निशाण असतं, त्या औषधांचं डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन करू नये.

कोणतंही मेडिकल स्टोअर लाल रंगाचं निशाण असलेली औषधं डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विक्री करू शकत नाही. शिवाय, या औषधांचं सेवन करण्याचा सल्ला देखील देऊ शकत नाही.

औषधांच्या पाकिटावर तुम्ही बऱ्याचदा Rx लिहिलेलं पाहिले असेल, पण याबाबत कधी विचार केला आहे का?. ज्या औषधांवर Rx लिहिलेलं असतं, ती औषधं केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत.

डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शन लिहून दिल्यानंतरच ती औषधं घ्यावीत. अन्यथा तुम्हाला प्रचंड शारीरिक नुकसान सहन करावं लागेल.

या औषधांची विक्री करण्याचा ज्या डॉक्टर तसंच वैद्यकीय दुकानांना परवानगी मिळाली आहे, त्यांच्याकडून औषधांची खरेदी करावी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!