Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : अमित शहा आणि मोदींवर पवारांची जोरदार टीका , मुख्यमंत्री २४ तारखेनंतर नागपूरला जातील

Spread the love

विधानसभेच्या प्रचाराला दोन दिवस बाकी असताना सर्च नेत्यांनी परस्परांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे . आज नाशिकच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कठोर शब्दात टीका केली. पवार म्हणाले कि ,  मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतलं पण इथे कसलीच प्रगती झालेली नाही. नाशिककरांना विचारलं की तुमचा दत्तक बाप कुठे आहे? आता नाशिकला दत्तक बापाची गरज नाही. आमच्या बापात दम आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. इतकंच नाही तर मुख्यमंत्री तुमचा बाड-बिस्तार आवरा आता तुम्हाला २४ तारखेला परत नागपूरला जायचं आहे असा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे. यावेळी नाशिकमध्ये बोलताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.

समोर कोणताचा पैलवान दिसत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही  शरद पवारांनी त्यांना चोख उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री म्हणतात समोर कोणी पैलवान दिसत नाही. पण २४ तारखेनंतर अंगाला तेल लावलेले पैलवान त्यांना दिसतील. मी कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे हे तुम्ही विसरू नका. तुम्हाला रेवड्यांवर खेळणारा  पोरगाही सरळ करेल अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना पवारांनी अमित शहा यांच्यावरही टीका केली. शरद पवारांनी इतक्या वर्षात काय केलं असा सवाल अमित शहा यांनी विचारला होता त्यावर शरद पवारांनी शहांवर टीका केली आहे.

फडणवीस रेवडी पहिलवान…

दरम्यान बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार यांनी कलम ३७० वरून नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘रेवडी’ पैलवान असून रेवड्यांवरची कुस्ती आम्ही खेळत नाही, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला. यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, केज राष्ट्रवादीचे उमेदवार पृथ्वीराज साठे, जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांची उपस्थित होते.

शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. भाजप प्रत्येक प्रश्नाला ३७० सांगतात सगळ्या प्रश्नाला उत्तर फक्त ३७० असें सांगतात. मूलभूत प्रश्न बाजूला आहे. शेतकरी, बेरोजगार, उद्योग बंद पाडले आणि सांगतात ३७० चा निर्णय म्हणे, ५६ इंच छातीने घेतला ते कोण निर्णय घेणारे हा निर्णय पार्लमेंटने घेतला असे म्हणत कलम ३७० चा समाचार घेतला. महाराष्ट्रात सध्या सगळीकडे चर्चा परळीची देशाचे पंतप्रधान आले. गुरूवारी परळीत काय बोलायचं तें बोलले पण परळीची जागा जिंकायची तर पंतप्रधानांशिवाय दुसरे गत्यंतर नाही. या निष्कर्शापर्यंत भाजप आली. मला खात्री आहे परळीची बहाद्दर जनता धनंजय मुंडेंला निवडून देईल. कारण सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे. हे तुम्हाला कळले आहे. धनंजय मुंडे परळीतून निवडणूक जिंकणार, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच शहा, मोदी, योगी येऊन टीका करतात. पवारांनी काय केले, माझं नाव घेतल्याशिवाय यांची सभा पूर्ण होत नाही, हे झोपेत पण चावळत असतील असा टोला लगावला.

मोठी गंमतीची गोष्ट भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, आमचा पैलवान तेल लावून तयार आहे. समोर पैलवान कुठे.. पण आम्ही रेवड्यावरची कुस्ती खेळत नाही. माझ्या आयुष्यात चौदा निवडणुका लढल्या त्यात 7 राज्य ७ केंद्र एकदा पण पराभव नाही. आत्ता नव्या पिढीला पुढे आणून महाराष्ट्र त्यांच्यात हातात द्यायचा, असे मत पवारांनी व्यक्त केले.

भाजप सत्तेचा वापर करुन खोट्या केसेस करते. चिदंबरम यांना आत टाकले निवडणुकीत तोंड देता येत नाही. म्हणून खोटे खटले आणि बदनाम करतात माझ्यावर खटला भरला त्यांची पंचाईत झाली. अशा लोकांना सत्तेच्या बाहेर घालवल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत केज आणि परळी विधानसभा मतदार संघात प्रचंड मताधिक्याने धनंजय मुंडे आणि पृथ्वीराज साठे यांना विजयी करा, असे आवाहन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!