Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : नशेच्या गोळ्याचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी गजाआड, गुन्हे शाखेची रेल्वेस्टेशन भागात कारवाई

Spread the love

नशेच्या गोळ्यांचा औरंगाबादमधील एजंटाला पुरवठा करणा-या मुख्य आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने रेल्वेस्टेशन भागातून गजाआड केले. शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा.नांदेड) असे मुख्य आरोपीचे नाव असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी शुक्रवारी (दि.१८) दिली.

गुन्हे शाखा पोलिसांनी १८ मार्च २०१९ रोजी नवजीवन कॉलनीत कारवाई करीत सागर बाबुराव शिंदे (रा.मयुरनगर, हडको) याला अटक केली होती. सागर शिंदे याच्या ताब्यातून ४ लाख ७५ हजार ९४८ रूपये विंâमतीची नशेची तसेच गर्भनिरोधक औषधी जप्त केली होती. तपासादरम्यान गुन्हे शाखेने पीएसआय वंâपनीचे रिजीनल ब्रॅच मॅनेजर संदीप पाटील, नॅशनल सेल्स एक्झीकेटीव्ह धीरज चावला यांना अटक केली होती. परंतु यांनी ही औषधी सागर शिंदे याला पुरवठा केली नसल्याचे तपासात समोर आले. तर शिंदे यांना नशेची औषधी शाहीद रज्जाक साहब गडबडे (रा.नांदेड) याने पुरवठा केली असल्याची माहिती मिळाली होती.

दरम्यान, शाहीद रज्जाक साहब गडबडे याने अटकपूर्व जामिन मिळावा यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने पेâटाळला होता. तेंव्हापासून शाहीद गडबडे हा मोबाईल बंद करून फिरत होता. शाहीद गडबडे हा रेल्वेस्टेशन भागात आला असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, जमादार विठ्ठल सुरे, संजयसिंह राजपूत, ओमप्रकाश बनकर, धर्मराज गायकवाड, पंढरीनाथ जायभाय, अमर चौधरी आदींच्या पथकाने शाहीद गडबडे याला गजाआड केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!