Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आर्थिक मंदीमुळे दररोज तीन लाख लोक बेरोजगार – शत्रुघ्न सिन्हा

Spread the love

आज आर्थिक मंदीमुळे दररोज तीन लाख लोक बेरोजगार होत आहेत़. राज्याची आर्थिक स्थिरता टिकविण्यासाठी आणि समाजात समन्वयाचे वातावरण ठेवण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी, असे आवाहन सिनेअभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांनी केले़.

तरोडा भागातील कॅनॉल रस्त्यावर काँग्रेस आघाडीचे नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डी़ पी़ सावंत यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मंचावर माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, उमेदवार डी़ पी़ सावंत, माजी मंत्री कमलकिशोर कदम उपस्थित होते़ ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, काँग्रेसने नेहमीच राष्ट्रहित जोपासण्याचे काम केले आहे़ त्यामुळे यापुढे देशाच्या विकासासाठी प्रगतीसाठी आणि सामाजिक सलोखा टिकविण्यासाठी काँग्रेसला साथ देणे गरजेचे आहे़ आज विकासाच्या नावावर सर्वत्र खड्डेच खड्डे दिसत आहेत़ मागील पाच वर्षांत सरकारने नोटाबंदी, जीएसटीसारख्या निर्णयातून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे़.

आ़ डी़ पी़ सावंत म्हणाले, लोकसभेला जे झालं ती चूक पुन्हा करू नका, जातीजातीमध्ये मतांचे विभाजन करून स्वत:ची पोळी भाजण्याचे काम केले़ तुमच्या सुख-दु:खात सहभागी होण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी सदैव तत्पर आहे़ उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले़ सूत्रसंचालन महेश देशमुख तरोडेकर यांनी केले़ दरम्यान, भोकर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांच्या प्रचारार्थ अर्धापूर येथे तर नांदेड दक्षिणचे उमेदवार मोहन हंबर्डे यांच्या प्रचारार्थ सिडको येथे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची प्रचारसभा पार पडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!