Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हा देश हिंदुराष्ट्र नाही , संघाच्या विचारधारेमुळे देशात फूट पडते आहे , संघावर बंदी आणा , अकाली तख्त प्रमुखांची मागणी

Spread the love

भारताला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करून आरएसएस ज्या प्रकारे देशात काम करत आहे, ते बघता देशात फूट पाडतील असं यातून स्पष्ट होत आहे, असं अकाल तख्तचं म्हणणं असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) बंदी आणा, अशी मागणी अकाल तख्त प्रमुखांनी (जत्थेदार) केली आहे.

अकाल तख्त साहिबचे जत्थेदार ज्ञानी हरप्रीत सिंग यांनी अमृतसरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. आरएसएस ज्या प्रकारे काम करत आहे, ते पाहता देशात फूट पाडतील असं वाटतं. त्यामुळे आरएसएसवर बंदी आणण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. भाजप स्वतः आरएसएसला मानतं, याबाबत सिंग यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता, जर असे असेल तर, ते देशासाठी चांगले नाही. देशाला हानी पोहोचवतील आणि देश उद्ध्वस्त करून टाकतील, असं सिंग म्हणाले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारत हे हिंदू राष्ट्र असल्याचे विधान केले होते तसेच मॉब लिंचिंगसंबंधीही  मोठं विधान केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव नेहमीच मॉब लिंचिंगच्या घटनांशी जोडले जाते, अशा घटनांशी संघाचा काहीही संबंध नाही, असे सांगतानाच लिंचिंग हा शब्द भारतातला नसून, मॉब लिंचिंगसारखा प्रकार भारतात होतच नाही, असे ते म्हणाले होते. इतकी विविधता असूनही लोक भारतात शांततेत राहतात आणि असे उदाहरण भारताशिवाय जगात कुठेही मिळत नाही, असंही त्यांनी सागितलं होतं.

संघप्रमुख यांच्या भारत हा हिंदू देश असल्याच्या विधानावर गैर हिंदू धर्मियांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या असून हा देश कुठल्याही धर्माचा नसून विविध धर्मांचा देश असल्याने भागवत यांचे विधान आक्षेपार्ह असल्याची टीका होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!