Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वंचित बहुजन आघाडी विजयी झाल्यास देशाचे राजकारण बदलेल : प्रकाश आंबेडकर

Spread the love

“विधानसभा निवडणुकीत आपला विजय झाला तर संपूर्ण देशाचा राजकारण बदलेल. विद्यमान सरकार घालवलं नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुमच्या बँक खात्यातील ९० टक्के रक्कम काढून घेतील,” असा टोला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या भाषणातून लगावला. जालन्यात आयोजित प्रचारसभेदरम्यान त्यांनी भाजपावर हल्लोबोल केला. दरम्यान, ही निवडणूक महत्त्वाची असून आपल्याला दृष्टी बदलायची असल्याचंही ते म्हणाले.

आम्ही यापूर्वी सत्तेत येण्याचा प्रयत्न केला. परंतु यशस्वी झालो नाही. यावेळी आम्हाला उमेदवारी, संघटना आणि मदत या तिन्ही गोष्टी मिळाल्या आहेत. त्यामुळे ही मिळालेल्या संधीचं सोनं करण्याची वेळ असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. आपण घराणेशाहीच्या विषय बोलतो. परंतु त्यांच्या येथेही घराणेशाही आहे. उमेदवारांना बॅगा उचलण्याशिवाय पर्याय नाही. याठिकाणी मान, सन्मान, सत्ता काहीच नाही. त्यामुळे अलुतेदार आणि बलुतेदार यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं.

विद्यमान सरकार घालवलं नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला १५ लाख देणं तर सोडा, तुमच्या बँकेत असलेल्या पैशांपैकी ९० टक्के रक्कम घेतल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “आम्ही २४० जागा निवडून आल्याशिवाय थांबणार नाही, असं ते म्हणतात. ते कोणते ज्योतिषी आहेत का? असा सवाल करत तुम्हाला या शास्त्रानं शिकवलं की ईव्हीएमनं,” असा सवालही त्यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!