Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : मस्तावलेले सरकार आणि बेलगाम उधळणाऱ्या बेलगाम घोड्यांना वंचितच वठणीवर आणू शकते , प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Spread the love

मस्तावलेल्या सरकारवर अंकुश ठेवल्याशिवाय आणि बेलगाम उधळलेल्या मस्तवाल घोड्यांचा लगाम पकडल्याशिवाय या देशाला वाचवता येणार नाही, आणि हे काम केवळ वंचित बहुजन आघाडीच करू शकते असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादच्या प्रचार सभेत बोलताना केला . राहुल गांधी यांच्यावरही टीका करताना कुंभकर्णासारखा झोपलेला हा नेता महाराष्ट्रात कशाला आला असा सवाल करून त्यांनी राहुलला प्रेमाचा सल्ला दिला कि , कृपा करून तू आता राफेलवर बोलू नको , कॉलेजची पोरं तुझी टिंगल उडवतील.  राफेलविषयी अधिकृतपणाने बोलण्याचा अधिकार फक्त मनमोहनसिंग यांना आहे. ज्या दिवशी मनमोहनसिंग आपलं तोंड उघडतील त्या दिवशी नरेंद्र मोदी यांचे कपडे फाटतील असे उद्गार प्रकाश आंबेडकर यांनी काढताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.भाजप नेत्यांनी कलम ३७० आणि राफेलवर बोलण्यापेक्षा महाराष्ट्रातील मुद्द्यांवर बोलावं अशी टीकाही  त्यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा औरंगाबादेतील आमखास  मैदानावर जंगी सभा झाली. या सभेच्या प्रारंभी प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील उमेदवारांचा परिचय करून देत वंचितच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. औरंगाबाद शहरातील मुस्लिम मतदारांच्या संदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले कि , आजवर मुस्लिम मतांचा वापर करण्यात आला म्हणून आज मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार वंचितच्या सोबत येत आहेत. राज्यातील उलेमांनी हि भूमिका घेतली आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचारांच्या वंचित आघाडीबरोबर उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

एम आय एम च्या बाबतीत बोलताना ते म्हणाले कि , या पक्षाचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवैसी चांगले नेते आहेत मात्र त्यांचे साठी गलत आहेत. मात्र वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद पूर्व मतदार संघातून एम आय एम चे उमेदवार गफार काद्री यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एम आय एम ने शिवसेनेला मदत केली आणि तत्वांशी फारकत घेतली अशी टीकाही केली.

आपल्या भाषणात प्रारंभी प्रकाश आंबेडकर यांनी आपला पक्ष सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी काय करू इच्छितो याची माहिती देऊन शहरातील घनकचऱ्यातून विद्युत निर्मिती करणे, नद्यांच्या आणि धरणाच्या पाण्याचे नियोजन करणे , लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे यावर महत्वाचे निर्णय आमचा पक्ष घेईल असे अभिवाचन दिले.

आपल्या भाषणात त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर अधिक प्रमाणात टीका करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचे जाहीर आवाहन केले. सभेला प्रचंड गर्दी होती. प्रारंभी उपस्थित उमेद्वारांनी आपली मनोगते व्यक्त केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!