महाबलीपूरम : पंतप्रधानांच्या साफसफाईच्या व्हिडिओवर प्रकाश राज यांनी उपस्थित केले रास्त प्रश्न !!

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तामिळनाडूमधील महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर प्लास्टिक वेचतानाचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ  पाहून प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी मात्र, यावरून सुरक्षा यंत्रणांना धारेवर धरले आहे.

Advertisements

प्रकाश राज म्हणाले, “आपल्या नेत्याची सुरक्षा कुठे आहे. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना स्वच्छता करण्यासाठी एकट का सोडलं. तेही एका कॅमेरामॅनसोबत. परदेशी शिष्टमंडळ भेटीवर येणार असतानाही संबंधित विभागाने स्वच्छता का केली नाही. त्यांची हिंमत कशी वाढली, “असा सवाल त्यांनी केला.

Advertisements
Advertisements

प्रकाश राज यांनी ट्विटच्या माध्यमातून ‘ जस्ट आस्किंग ‘ म्हणून हा उपहासात्मक सवाल केला आहे. राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश राज यांचे हे ट्विट इंटरनेटवर जोरदार चर्चेत आहे. १३ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी या ट्विटवर आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या या मिष्किल ट्विटचे कौतुक केले, तर काहींनी मोदींची पाठराखण करत त्यांच्यावर टीका केली आहे.

नरेंद्र मोदी महाबलीपुरमच्या समुद्र किनाऱ्यावर सकाळी पळण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी ३० मिनिटे समुद्र किनाऱ्याची सफाई केली. या सफाई दरम्यान चित्रित केलेला व्हिडीओ स्वत: मोदींनी ट्विट केला होता. या ट्विटमागे त्यांचा देशातील नागरिकांना स्वच्छतेची प्रेरणा मिळावी असा हेतू होता, असे म्हटले जाते.

यावरून ट्विटरवर बऱ्याच उलट सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

आपलं सरकार